---Advertisement---

सीएसकेच्या स्टार खेळाडूने थाटला सुखी संसार, ‘सुपर कपल’ म्हणत फ्रँचायझीने दिल्या शुभेच्छा

On: शनिवार, जून 11, 2022 11:23 PM
C-Hari-Nishaant-marriage
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सी. हरी निशांत नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याने ९ जून रोजी अनुसोबत सुखी संसारासाठी सात फेरे घेतले. सीएसकेने शुक्रवारी सकाळी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर करून निशांतला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

आयपीएल २०२२ मध्ये सीएसकेने सी. हरी निशांत (C Hari Nishanth) या युवा खेळाडूला खरेदी करण्यासाठी, त्याच्या बेस प्राईसएवढे म्हणजेच २० लाख रुपये खर्च केले. निशांत सीएसकेच्या संघात सहभागी असला, तरी त्याच्या आयपीएल पदार्पणाची प्रतिक्षा अजूनही संपली नाही. असे असले तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो तमिळनाडू संघाचा नियमित खेळाडू आहे.

तमिळनाडू संघाच्या या महत्वाच्या खेळाडूने ९ जून रोजी अनुसोबत सुखी संसाराला सुरुवात केली. सीएसकेने त्यांच्या ट्वीटर खात्यावरून या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सीएसकेने त्यांचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे दोघेही आनंदात हसताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फ्रँचायझीने लिहिले की, “हरीचे लग्न झाले! आम्ही तुम्हाला सुपर कपल’ म्हणून संबोधित करत आहोत.”

निशांतचे वय सध्या अवघे २५ वर्ष आहे आणि भविष्यात त्याच्याकडे एक मोठा खेळाडू बनण्याची गुणवत्ता देखील आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या २०२०-२१ हंगामात त्याने जबरदस्त प्रदर्शन केले होत. त्याने या हंगामात ४१ च्या सरासरीने २४६ धावा केल्या होत्या. यामध्ये अंतिम सामन्यातील ३५ धावांची महत्वाची खेळीही सहभागी आहे. निशांतने त्याचा लहानपणीचा मित्र आणि सीएसकेचा खेळाडू एन जगदीशनच्या आधी फलंदाजी केली होती.

चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या सीएसकेसाठी आयपीएल २०२२ एखाद्या भयानक स्पप्नाप्रमाणे होता. कारण हंगामातील त्यांचे प्रदर्शन खूपच खराब राहिले होते. खेळलेल्या १४ सामन्यांपैकी त्यांना फक्त ४ सामने जिंकता आले आणि संघ गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर होता. हरी निशांतसाठी देखील हंगाम काही खास ठरला नाही. कारण त्याला संपूर्ण हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि पदार्पण देखील करता आले नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा ख्रिस केर्न्स, राजासारखं जगूनही का झालीय त्याची दुर्दशा?

कटकमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू चाखणार ‘या’ पदार्थांची चव, पाहा मेन्यू

मुंबईसह ‘या’ ४ संघांनी मिळवलंय रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट, कधी आणि कुठे होणार मॅच?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---