---Advertisement---

जिंकल्यानंतर चेन्नईने असा साजरा केला केदार जाधवचा वाढदिवस

On: बुधवार, मार्च 27, 2019 8:14 PM
---Advertisement---

दिल्ली। मंगळवारी आयपीएल 2019 मधील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नईने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा चेन्नईचा या मोसमातील सलग दुसरा विजय आहे.

हा विजय चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवसाठी खास ठरला आहे. कारण मंगळवारी केदारचा 34 वा वाढदिवस होता. त्याचा हा वाढदिवस चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सामन्यात विजय मिळवल्यानंतर जोरदार साजरा केला आहे.

याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की केदारचा चेहरा खेळाडूंनी केकने भरवला आहे. तसेच एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, सुरेश रैना, सॅम बिलिंग्ससह अन्य खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये मस्ती करत आहेत.

मंगळवारी झालेल्या या सामन्यात दिल्लीकडून शिखर धवनने 47 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 147 धावा केल्या आणि चेन्नईला विजयासाठी 148 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान चेन्नईने 19.4 षटकात सहज पूर्ण केले.

चेन्नईकडून केदारने 34 चेंडूत 27 धावा केल्या. तर शेन वॉटसनने 44, सुरेश रैनाने 30 आणि एमएस धोनीने 32 धावांची खेळी करत चेन्नईच्या विजयाला हातभार लावला. तत्पूर्वी चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

दोन-तीन वर्षात भारतीय संघात हा खेळाडू करणार पदार्पण

भर मैदानात इशांत, रबाडाचे वाॅटसनबरोबर झाले वाद, या खेळाडूने केली मध्यस्थी

‘कमॉन पापा’ म्हणत कॅप्टन कूल धोनीला चिअर करणाऱ्या झिवाचा व्हिडीओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment