---Advertisement---

‘कमॉन पापा’ म्हणत कॅप्टन कूल धोनीला चिअर करणाऱ्या झिवाचा व्हिडीओ व्हायरल

On: बुधवार, मार्च 27, 2019 4:45 PM
---Advertisement---

दिल्ली। मंगळवारी आयपीएल 2019 मधील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नईने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा चेन्नईचा या मोसमातील सलग दुसरा विजय आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या हे दोन्ही सामने पाहण्यासाठी कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवा तिची आई साक्षीसह स्टँडमध्ये उपस्थित होती. या दरम्यानचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

पण मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान झिवा तिचे वडील एमएस धोनीला ‘कमॉन पापा’ म्हणत प्रोत्साहन देताना दिसली आहे. तिचा हा व्हिडिओ आयपीएल तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावर शेअरही करण्यात आला आहे. या व्हिडिओने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.

काहीदिवसांपूर्वी धोनीने झिवाबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती भारतातील विविध भाषांमध्ये धोनीने विचारलेल्या प्रश्नांना त्याच भाषांमध्ये उत्तरे देत होती. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

https://www.instagram.com/p/BvZHMeSlO29/

धोनी हा भारतातीलच नाही तर जगातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याची मुलगी झिवाचे देखील फॅन फोलोइंग मोठे आहे. तिचे इंस्टाग्रामवर अकाउंट देखील आहे. त्याला जवळ जवळ 6 लाख 48 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

मंगळवारी झालेल्या या सामन्यात धोनीने 35 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली आहे. त्याचबरोबर चेन्नईकडून शेन वॉटसनने 44, सुरेश रैनाने 30 आणि केदार जाधवने 27 धावांची खेळी करत चेन्नईच्या विजयाला हातभार लावला. तत्पूर्वी चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

दिल्लीकडून शिखर धवनने 47 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 147 धावा केल्या आणि चेन्नईला विजयासाठी 148 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान चेन्नईने 19.4 षटकात सहज पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल सामन्यादरम्यान चौकीदार चोर हैं घोषणांनी स्टेडियम दणाणले

युवराज सिंगच्या एक पाऊल पुढे निघाला हा मुलगा, ठोकले ७ चेंडूत ७ षटकार..

प्रो कबड्डी सीजन ७ लिलावात या टाॅप ५ खेळाडूंवर असतील जास्त नजरा !

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment