Loading...

प्रो कबड्डी सीजन ७ लिलावात या टाॅप ५ खेळाडूंवर असतील जास्त नजरा !

प्रो कबड्डी सीजन ७ च्या लिलावसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जूनमध्ये सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी पर्व ७ साठी मुंबईत ८ व ९ एप्रिल रोजी लिलाव होणार आहे. या लिलावकडे सर्वांचे लक्ष लागले असून यंदा कोणावर किती बोली लागणार हे यांची उत्सुकता आहे.

प्रो कबड्डी सीजन ७ साठी १२ संघांनी मिळवून आतापर्यंत २९ खेळाडूंना रिटेन (कायम) केलं आहे. त्यात महत्वाची नाव म्हणजे अजय ठाकूर, रोहित कुमार, पवन शेरावत, प्रदीप नरवाल, फझल अत्रचली आदी २९ खेळाडूंना संघानी कायम ठेवला आहे. तर बाकी खेळाडू लिलावसाठी उपलब्ध असणार आहेत.

प्रो कबड्डी सीजन ६ मध्ये पदार्पण केलेल्या सिद्धार्थ देसाई कडे यंदाचा लिलावात सगळ्यांचे लक्ष असणार आहे. आपल्या पहिल्याच सीजन मध्ये छाप पडलेला सिद्धार्थ देसाई यंदा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. सिद्धार्थ देसाईला कोणता संघ घेणार याकडे उत्सुकता लागली आहेतच पण सिद्धार्थ ला पुन्हा संघात घेण्यासाठी यु मुंबा कडे एफबीम कार्डची संधी असेल.

गेल्यावर्षी झालेल्या लिलावात दुसरा महागडा खेळाडू पोस्टर बॉय राहुल चौधरी ही लिलावात असणार आहे. प्रो कबड्डीत ८०० गुण मिळणारा पहिला खेळाडू आहे. मागील वर्षी तब्बल १.५१ कोटींची बोली लागलेल्या मोनू गोयात वर ही लक्ष वेधले जाऊ शकत. तर मागील पर्वत पुणेरी पलटण कडून खेळणारा नितीन तोमर लिलावात असणार आहे. इंजुरी मुळे नितीन टोमरला पुणेरी पलटण कडून सर्व सामने खेळता आले नाहीत. सिद्धार्थ देसाई प्रमाणेच महाराष्ट्राच्या रिशांक देवाडीकावर चांगली बोली लागू शकते.

प्रो कबड्डी सीजन ६ च्या हरियाना स्टीलर्सच्या पहिलाच सामन्यात इंजुरी झालेल्या सुरेंद्र नाडाला पूर्ण सीजन ला बाहेर बसावं लागला. इंजुरी तुन पूर्ण फिट होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरणाऱ्या नाडा कडे लक्ष असणार आहे. डिफेडरच्या यादीमध्ये सर्वाधिक बोली ही लागू शकते. तर राष्ट्रीय स्पर्धेत व सीजन ६ मध्ये छाप पडलेल्या परवेश भैस्वाल यंदा लिलावात सगळ्याच लक्ष वेधून घेऊ शकतो.

प्रो कबड्डीतील अनुभवी राईट कव्हर सुरजीत सिंग वर मोठी बोली लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर यंदा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या गिरीश इरणक कडे सर्व संघाच लक्ष असणार आहे. मागील सीजन मध्ये पुणेरी पलटण संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या गिरीश इरणक साठी पुणेरी पलटण एफबीम कार्ड वापरू शकते.

भारतीय रेल्वेचा कर्णधार धर्मराज चेरलाथन नेतृत्वाखाली रेल्वेने राष्ट्रीय स्पर्धेचा विजेतेपद पटाकवले. वयाने सर्वात मोठा असणाऱ्या चेरलाथन ने आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईत होणाऱ्या या लिलावात मोठया बोली लागण्याच्या शक्यता आहेत. यांच्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूंवर जास्त बोलू शकते हे बघणं उत्सुकतेचा ठरणार आहे.

Loading...

या पाच चढाईपटू वर असतील सर्वात जास्त नजरा…
१) सिद्धार्थ देसाई (२१८ रेड पॉईंट्स, २१ सामने)
२) राहुल चौधरी (८२५ रेड पॉईंट्स, १०० सामने)
३) मोनू गोयत (४१० रेड पॉईंट्स, ५९ सामने)
४) नितीन तोमर (३७७ रेड पॉईंट्स, ५३ सामने)
५) रिशांक देवडीका (५४९ रेड पॉईंट्स, १०२ सामने)

या पाच पकडपटू वर असतील सर्वात जास्त नजरा…
१) सुरेंद्र नाडा (२२२ टॅकल पॉईंट्स, ७१ सामने)
२) परवेश भैस्वाल (१३७ टॅकल पॉईंट्स, ५६ सामने)
३) सुरजीत सिंग (२१५ टॅकल पॉईंट्स, ७३ सामने)
४) गिरीश इरणक (२२८ टॅकल पॉईंट्स, ८९ सामने)
५) धर्मराज चेरलाथन (२१६ टॅकल पॉईंट्स, ९९ सामने)

You might also like
Loading...