---Advertisement---

पारंपारिकतेला नाविन्याची जोड! चेन्नईच्या कॅम्पमध्ये कॉनवेच्या प्री वेडींगचे सेलिब्रेशन, धोनीसह खेळाडू दिसले पारंपारिक वेषात

Devon-Conway-Pre-Wedding-Celebration
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगमधील यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नाव आवर्जून घेतले जाते. पण आयपीएलच्या १५ व्या हंगामात संघाची कामगिरी अपेक्षित अशी झाली नसून संघ विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. पण असे असले तरी, संघाचे मैदानाबाहेरील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचमुळे खेळाडू मैदानाबाहेर मजा-मस्ती करताना दिसत आहेत. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू सलामीवीर डेवॉन कॉनवे याच्या प्री वेडींग सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. 

असे म्हणले जात आहे की, कॉनवे (Devon Conway) त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसन (Kim Watson) हिच्याशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांनी २०२० मध्ये साखरपूडा केला होता. त्यामुळे त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून प्री-वेडींग पार्टी (Pre Wedding Celebration) आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी १८ एप्रिल रोजी हॉटेलमध्ये आयोजित केली होती. या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यावेळी चेन्नई संघाचे खेळाडूंसह जवळपास सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच सर्वजण पारंपारिक पोषाखात दिसत आहेत. सर्वांनी बंडीसारखे वेगवेगळ्या रंगाचे प्लेन शर्ट घातले आहेत. तसेच दाक्षिणात्य पद्धतीने लुंगी नेसली आहे. तसेच खेळाडू कॉनवेबरोबर डान्स करताना दिसून येत आहे. या पार्टीसाठी कॉनवेटी गर्लफ्रेंड व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांशी जोडली गेली होती. तसेच कॉनवेने या पार्टीत केकही कापला. तसेच सर्वांना बुफे स्टाईलने जेवणही वाढले गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.

 

कॉनवेने या पार्टीसाठी चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) आभारही मानले. याबरोबरच खेळाडू आणि चेन्नईचे अन्य सदस्य यावेळी कॉनवेला शुभेच्छा देताना आणि त्याला लिफाफे देतानाही दिसले. यात चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश होता. कॉवनेच्या प्री वेडींग पार्टीच्या व्हिडिओ आणि फोटोंना सध्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

चेन्नईने कॉनवेला आयपीएल २०२२ साठी लिलावात १ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्याने चेन्नईकडून पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळालेली नाही.

चेन्नईची कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आत्तापर्यंत ६ सामने खेळले असून ५ सामने पराभूत झाले असून एकच सामना जिंकण्यात त्यांना यश मिळाले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

केएल राहुल विराटला ठरला सरस! ६००० टी२० धावा करत ‘या’ विक्रमात पटकावला अव्वल क्रमांक

जेव्हा डिविलियर्सच दिनेश कार्तिकचे ३६० डिग्री खेळाडू म्हणत करतो कौतुक, वाचा काय म्हणाला

हेच बाकी होतं!! विराटने मोडली स्वत:चीच ४ वर्षांची परंपरा, लखनऊविरुद्ध झाला ‘गोल्डन डक’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---