इंडियन प्रीमियर लीगच्या २०२१ हंगामातील १२ वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघांत खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने ४५ धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा हा आयपीएल २०२१ मधील दुसरा विजय आहे. या सामन्यात चेन्नईने १८८ धावा बनवताना एक अनोखा विक्रम नोंदविला.
चेन्नईने गाठला १८८ धावांचा टप्पा
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. सलामीवीर फाफ डू प्लेसीस व ऋतुराज गायकवाड यांनी संघासाठी सुरुवात केली. ऋतुराज केवळ १० धावा बनवू शकला. मात्र, प्लेसीसने १७ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू व कर्णधार एमएस धोनी यांनी अनुक्रमे २६, १८, २७ आणि १८ धावा बनविल्या. अष्टपैलू सॅम करनने १३ धावांचे योगदान दिले. अनुभवी ड्वेन ब्राव्होने अखेरच्या दोन षटकात आक्रमक फटकेबाजी करून ८ चेंडूत नाबाद २० धावा चोपल्या.
चेन्नईचा अनोखा विक्रम
या सामन्यात १८८ धावा बनवत चेन्नईने एक अनोखा विक्रम केला. कोणत्याही फलंदाजाने ४० धावा न बनवता आयपीएलच्या इतिहासात उभारलेली ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावे होता. मुंबईने आयपीएल २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटविरूद्ध ही कामगिरी केलेली. त्यांनी या सामन्यात १८४ धावा बनविलेल्या. हा सामना पुणे येथील एमसीए स्टेडियमवर खेळला गेला होता. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी डेक्कन चार्जर्सचा संघ असून त्यांनी २००८ मध्ये दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर दिल्ली डेरडेव्हिल्सविरुद्ध १८२ धावांपर्यंत मजल मारलेली.
चेन्नईचा दुसरा विजय
फलंदाजांनी उभारलेल्या १८८ धावांचा बचाव करताना चेन्नईच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. रवींद्र जडेजा व सॅम करन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत राजस्थानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. मोईन अलीने सर्वोत्तम गोलंदाजी करताना तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. राजस्थानचा संघ २० षटकात केवळ १४३ धावा काढू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि धोनीला डाईव्ह माराताना पाहून चाहत्यांना झाली २०१९ विश्वचषकातील ‘त्या’ घटनेची आठवण
CSK vs RR : चेन्नईचे गोलंदाज राजस्थानच्या फलंदाजांना पडले भारी, चेन्नईचा ४५ धावांनी दणदणीत विजय
हे काहीतरी वेगळंच! संजू सॅमसनने पुन्हा एकदा टॉसनंतर नाणे उचलून ठेवले स्वत:कडेच, पाहा व्हिडिओ