---Advertisement---

अरेरे! प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारुनही ‘इतक्यांदा’ सीएसकेच्या नशीबी आलाय पराभव

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 12:57 PM
csk
---Advertisement---

शनिवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्स संघाच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला आणि चेन्नई सुपर किंग्स संघाला ७ गडी राखून पराभूत केले. या पराभवासह चेन्नई सुपर किंग्स संघाने नको असलेल्या विक्रमाच्या यादीत स्थान मिळवले आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत चेन्नईच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. यामध्ये ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नईला २० षटकअखेर ४ बाद १८९ धावा करण्यात यश आले होते.

चेन्नईने नको असलेल्या विक्रमाच्या यादीत मिळवले स्थान 
राजस्थान रॉयल्स संघाकडून १९० धावांचा पाठलाग करण्यासाठी एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानात आली होती. एविन लुईस २७ धावा करत माघारी परतला होता. तर यशस्वी जयस्वालने ५० धावांची खेळी केली होती. त्यानंतर शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. त्याने ४२ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि ४ चौकारांच्या साहाय्याने ६४ धावांची खेळी केली. यासह राजस्थान रॉयल्स संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. अशाप्रकारे चेन्नई संघाने १८० पेक्षा अधिक धावा करून देखील पराभूत होणाऱ्या संघाच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स हा एकमेव संघ आहे, जो १२ वेळेस १८० पेक्षा धावा करूनही पराभूत झाला आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचा समावेश आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी ९-९ सामने गमावले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ वेळेस १८० पेक्षा अधिक धावा करूनही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएल स्पर्धेत १८० पेक्षा अधिक धावा करून पराभूत होणारे संघ 
१२ वेळेस – पंजाब किंग्स
९ वेळेस – चेन्नई सुपर किंग्स*
९ वेळेस – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
७ वेळेस – कोलकाता नाईट रायडर्स

महत्त्वाच्या बातम्या-

बेंगलोर वि. पंजाब सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

‘पृथ्वी लक्ष कुठं आहे, बॉल तर इथं आहे’, काळा चष्मा घातलेल्या क्षेत्ररक्षक शॉचा उडाला गोंधळ

पहिल्या डावात पंगा घेणाऱ्या कृणालला अश्विनचे बॅटीने उत्तर, ‘धोनी स्टाईल’ षटकारासह जिंकवला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---