---Advertisement---

IPL मधील आव्हान संपल्यानंतर धोनीसह चेन्नई संघ भारतात रिटर्न

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 1:52 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 हंगामात सर्वप्रथम आव्हान संपलेला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. आयपीएलच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ ‘प्ले ऑफ’ मध्ये खेळताना दिसणार नाही. दरम्यान चेन्नईचा संघ आता लगेचच यूएईहून थेट भारतात परतला आहे.

यूएईहून भारतात परतताना चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक सेल्फी फोटो पोस्ट केला आहे. या फोटो मध्ये त्याच्या समवेत संघाचा कर्णधार धोनी आणि मध्यमगती गोलंदाज मोनु कुमार बसलेले दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CHFxPMiLLhC/

त्याचबरोबर एन जगदिसन या युवा खेळाडूनेही तो कोयंबतूरला पोहचला असल्याचे ट्विट करुन सांगितले आहे.

https://twitter.com/Jagadeesan_200/status/1324245042572095489

चेन्नई सुपर किंग्ज संघाने या हंगामात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. 14 सामन्यांत त्यांना जेमतेम 6 सामने जिंकता आले. आणखीन एखादा सामना जिंकता आला असता तर कदाचित रन रेटच्या आधारावर चेन्नईचा संघ ‘प्ले ऑफ’ पर्यंत पोहोचू शकला असता. परंतु या दोन्ही गोष्टी चेन्नईला करता आल्या नाहीत.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी देखील खराब प्रदर्शन करताना दिसला. या हंगामात त्याला अर्धशतक झळकावून बॅट उंचावण्याची एकही संधी मिळाली नाही. चेन्नईने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभूत करून विजयाने खाते उघडले होते. पण पुढे जाऊन चेन्नईची कामगिरी खालावत गेली. अगदी शेवटचे काही सामने जिंकल्याने गुणतालिकेतील शेवटचे स्थान सोडून चेन्नईचा संघ सातव्या स्थानापर्यंत पोहोचला. दरम्यान धोनीने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत पुढील हंगामात खेळणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

धोनी पुन्हा दिसणार पिवळ्या जर्सीत

पंजाब विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यांत धोनीने त्याच्या आयपीएल मधील निवृत्ती बाबत होणाऱ्या चर्चा- अफवांना पूर्णविराम लावला. हा हंगाम शेवटचा नसून पुढच्याही हंगामात खेळणार असल्याचे धोनीने यावेळी स्पष्ट केले. यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील हंगामात अनेक बदल होऊन संघ पुनरागमन करेन असाही विश्वास चेन्नईच्या चाहत्यांना धोनीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये आयपीएलचे आयोजन? सौरव गांगुलीने दिली माहिती

“रोहितच्या दुखापतीचा फायदा घेऊ”, क्वालिफायर सामन्याआधी दिल्लीच्या दिग्गजाची चेतावणी

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

टेकडीचा हिमालय होताना!

हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---