इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम नुकताच यूएई येथे पार पडला. या हंगामात एमएस धोनीची चमक पाहायला मिळाली नाही. त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाला यंदा प्ले ऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. एवढेच नव्हे, तर धोनीने अपेक्षेप्रमाणे फलंदाजीही केली नाही. अशातच धोनीला पुढील आयपीएल हंगामासाठी संघ कायम करेल का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता या विषयावर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने त्याची मते मांडली आहेत.
सीएसकेने धोनीला रिलीझ करावे -आकाश चोप्रा
आकाश चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये त्याने म्हटले की, “मला वाटते सीएसकेने एमएस धोनीला रिलीझ करावे जेणेकरून तो मेगा लिलावात येऊ शकेल. मेगा लिलावातील खेळाडू संघात तीन वर्षे राहू शकतो. परंतु धोनी तुमच्याबरोबर तीन वर्षे राहू शकेल का?, मी असे म्हणत नाही की धोनीला संघात स्थान देऊ नये. तो पुढची आयपीएल स्पर्धा खेळेल, पण जर तुम्ही त्याला रिटेन खेळाडू म्हणून संघात ठेवले, तर तुम्हाला त्याला 15 कोटी रुपये द्यावे लागतील.”
….राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून धोनीला घेऊ शकता परत
लिलावाबद्दल सविस्तर सांगताना आकाश चोप्रा म्हणाला की, “जर धोनी पुढील तीन वर्षे संघात राहिला नाही आणि केवळ 2021 चा आयपीएल हंगाम खेळला तर, 2022 च्या हंगामात तुम्ही 15 कोटी रुपये परत घेऊ शकता. परंतु 15 कोटी रुपयांचा खेळाडू कोठून आणणार? हा मेगा लिलावाचा फायदा आहे. आपल्याकडे पैसे असल्यास आपण एक मोठा संघ बनवू शकता. जर तुम्ही धोनीला मेगा लिलावासाठी रिलीझ केले, तर तुम्ही त्याला राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून परत संघात घेऊ शकता आणि तुमच्या इच्छेनुसार पैसे देऊन तुम्ही योग्य खेळाडू निवडू शकता. तुम्ही धोनीला लिलावातही घेऊ शकता. सीएसकेच्या फायद्याचा विचार केल्यास धोनीला रिलीझ करून लिलावात विकत घेणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.”
सीएसकेला मेगा लिलावाची अधिक गरज
पुढे बोलताना आकाश चोपडा म्हणाला की, “सध्या आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी सीएसकेला मेगा लिलावाची अधिक गरज आहे. सध्या, सीएसके आपल्या जुन्या खेळाडूंबरोबर राहील की नवीन खेळाडू निवडेल याबाबत कोणालाच कल्पना नाही. शेन वॉटसनने यापूर्वीच तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अशा स्थितीत तो पुढच्या वर्षी या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.”
रैना, हरभजन यांना संधी देणार?
“सीएसके संघात कायम करण्यासाठी अधिक खेळाडू नाहीत. जर तुम्हाला प्रभावी संघ बनवायचा असेल, तर फाफ डु प्लेसीस आणि अंबाती रायुडू यासारख्या खेळाडूंवर जास्त पैसे खर्च करणार का? मला वाटत नाही की जर सीएसकेला प्रभावी संघ बनवायचा असेल, तर ते सुरेश रैना आणि हरभजन सिंग याच्यावर लक्ष केंद्रीत करतील.” असेही पुढे बोलताना आकाश म्हणाला
आयपीएल 2020 मध्ये सीएसके होता 7 व्या स्थानावर
आयपीएलच्या 13 व्या हंगामात सीएसके 14 सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
संकटच असे ओढवले की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे चार्टर्ड विमानाने केले स्थानांतर
नादच खुळा! महिला बीबीएलमध्ये ‘या’ खेळाडूने ठोकला अचंबित करणारा चौकार
“श्रेयस अय्यरमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता”, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केले कौतुक
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…