अखेर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला अंतिम सामन्यात भिडणारे दोन संघ मिळालेच. आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडेल. हा सामना रविवारी (दि. 28 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल. या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात संघ आपल्या किताबाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके संघ पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच महेंद्र सिंग धोनी मैदानात पाऊल टाकताच इतिहास रचेल.
धोनी रचणार इतिहास
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्धच्या सामन्यात एमएस धोनी 250वा आयपीएल सामना (MS Dhoni 250th IPL Match) खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. एमएस धोनी (MS Dhoni) अशी कामगिरी करणारा आयपीएल (IPL) इतिहासातील पहिला खेळाडू बनेल. धोनीनंतर या लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा क्रमांक लागतो. रोहितने आयपीएलमध्ये 243 सामने खेळले आहेत. तसेच, दिनेश कार्तिक याने 242 सामने खेळले असून तो यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
आयपीएल 2023मधील धोनीची कामगिरी
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत धोनीची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्याला अधिकतर सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाहीये. मात्र, अखेरच्या षटकात फलंदाजीला येऊन त्याने चांगलीच फटकेबाजी केली आहे. या हंगामात खेळलेल्या 15 सामन्यात धोनीने 185च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांचा घाम काढला आहे. त्याने यादरम्यान 104 धावा केल्या आहेत.
चेन्नईवर भारी पडलाय गुजरात संघ
आमने-सामने कामगिरी पाहायची झाल्या, गुजरात संघाचे पारडे चेन्नईविरुद्ध जड असल्याचे दिसते. दोन्ही संघात आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे, तर उर्वरित 1 सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. आयपीएल 2023च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरातला पराभूत करत अंतिम सामन्यात एन्ट्री केली होती.
चेन्नईकडे सुवर्णसंधी
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडे आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी करण्याची सुवर्णसंधी आहे. चेन्नईने आतापर्यंत 2010, 2011, 2018 आणि 2021 या चार आयपीएल हंगामात विजेतेपद जिंकले होते. तसेच, रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नईने जर अंतिम सामन्यात गुजरातविरुद्ध विजय मिळवला, तर ते मुंबईची बरोबरी करतील. (csk skipper ms dhoni will play 250th ipl match against gujarat titans in final of ipl 2023 gt vs csk ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू काय उखडलंस…’, नवीन उल हकला ट्रोल करणे मुंबईच्या ‘या’ फलंदाजाच्या अंगलट; युजर्सनी साधला निशाणा
ये ब्रोमान्स है! फायनलमध्ये पोहोचताच गिलला किस करण्यासाठी धावला मिलर, पंड्यानेही लावला नंबर; Photo