इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील साखळी सामने संपले असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. क्वालिफायरची पाहिली लढत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे, संघातील दिग्गज फलंदाज दुखापतग्रस्त असल्याने तो दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणे कठीण आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल २०२० स्पर्धेत प्लेऑफ गाठण्यात अपयश आले होते. त्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेत या संघाने सर्वप्रथम प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मान मिळवला. दरम्यान निर्णायक सामन्यात संघातील दिग्गज खेळाडू सुरेश रैना दुखापतीमुळे खेळताना दिसून येणार नाहीये.
माध्यमातील वृत्तांनुसार, रैना गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या क्वालिफायर सामन्यालाही मुकू शकतो. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाहीये. तसेच जर चेन्नई सुपर किंग्स संघ अंतिम फेरीत पोहोचला तर सुरेश रैना उपलब्ध असेल का? याबाबत देखील कुठलीही माहिती देण्यात आली नाहीये.
सुरेश रैनाने आयपीएल २०२१ स्पर्धेतील सर्व सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु दुखापतीमुळे त्याला शेवटच्या २ सामन्यातून बाहेर राहावे लागले आहे, ज्यामुळे त्याच्या ऐवजी रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली होती. परंतु रॉबिन उथप्पा या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. जर सुरेश रैना पूर्णपणे फिट नसेल तर प्लेऑफच्या सामन्यात देखील रॉबिन उथप्पाला त्याच्याजागी संधी दिली जाऊ शकते.
यूएईत सुरेश रैनाची फ्लॉप कामगिरी
आयपीएल २०२० स्पर्धेत सुरेश रैनाने आयपीएल स्पर्धा खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर २०२१ स्पर्धेतून त्याने या स्पर्धेत पुनरागमन केले. भारतात पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सुरेश रैना चांगल्या फॉर्ममध्ये होता. परंतु दुसऱ्या टप्प्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
तसेच जर चेन्नई सुपर किंग्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने या स्पर्धेत १४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ९ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे, चेन्नई सुपर किंग्ज संघाला मागील सलग ३ सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले आहे. अशात हा संघ दिल्लीविरुद्ध कशी कामगिरी याकडे सर्वांच्या नजरा असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाला लाभणार ‘या’ दिग्गजाचे मार्गदर्शन, इंग्लंडला बनवलेय विश्वविजेता
रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? ‘या’ नव्या परदेशी दिग्गजाचे नाव चर्चेत
इशान-सूर्यकुमारच्या फटकेबाजीपुढे पियुष चावलाचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षित!