---Advertisement---

चेन्नईचे कट्टर समर्थक आहात ना? मग ‘या’ आठ जणांविषयी तुम्हाला माहीतच हवे

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 11:33 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) शुक्रवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. या विजयानंतर प्रत्येकजण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्या संघाचे कौतुक करत आहे. त्याचवेळी चेन्नईच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्यामध्ये असे आठ जण दिसत आहेत जे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चौदाव्या हंगामापर्यंत संघाचा भाग राहिले आहेत. आज आपण त्याच आठ जणांविषयी जाणून घेऊया.

कोण आहे ते आठ जण
चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यामध्ये कर्णधार एमएस धोनी, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग व वरीष्ठ खेळाडू सुरेश रैना यांच्यासह एकूण आठ जण दिसत आहेत.

या छायाचित्रात संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन, टीम मॅनेजर रसेल राधाकृष्णन, फिजिओ टॉमी सिमसेक, ट्रेनर ग्रेग किंग, परफॉर्मन्स ऍनालिस्ट लक्ष्मी नारायणन यांचा समावेश आहे. हे सर्वजण पहिल्या हंगामात तसेच पुढच्या सर्व हंगामात संघाचा भाग राहिले आहे.

चेन्नई संघाला ज्यावेळी दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते त्यावेळी यातील काही सदस्य इतर संघाशी संलग्न झाले होते. मात्र, त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा चेन्नई संघासोबत सोडले गेले.

चेन्नईचे चौथे विजेतेपद
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत, सीएसकेला फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने निर्धारित २० षटकात ३ बळी गमावून १९२ धावा उभ्या केल्या. सीएसकेने दिलेल्या १९३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यात केकेआर संघ अपयशी ठरला. त्यांनी निर्धारित २० षटकात ९ बळी गमावत १६५ धावा केल्या. अशाप्रकारे चेन्नईने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली.

महत्त्वाच्या बातम्या-

करायचं होतं एक अन् झालं भलतंच! द. आफ्रिकेने चेन्नईच्या विजयानंतर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर डू प्लेसिस, स्टेनकडून टीका

धोनीकडून घडली मोठी चूक अन् जडेजा- गायकवाडने लावला डोक्याला हात; व्हिडिओ पाहाच

द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यामागे ‘लॉर्ड’ शार्दुल कनेक्शन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---