---Advertisement---

चेन्नई आणि जडेजा यांच बिनसलं? ‘या’ गोष्टीमुळे चर्चेला उधाण

On: बुधवार, मे 11, 2022 11:56 AM
Ravindra-Jadeja-In-PC
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा सध्या रोमांचक टप्प्यावर आहे. मात्र, या आयपीएल हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. या हंगामात त्यांची प्लेऑफला जाण्याची संधीही जवळपास संपुष्टात आली आहे, त्यामुळे त्यांच्या संघाला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता अशी चर्चा होत आहे की चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार रविंद्र जडेजा आणि फ्रँचायझी यांच्यात काही बिनसलय का?

चेन्नई आणि जडेजा यांच बिनसलं?
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) इंस्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोविंगच्या यादीत रविंद्र जडेजाचे अकाऊंट दिसत नाहीये. त्यामुळे अशी चर्चा सध्या रंगली आहे की, चेन्नई सुपर किंग्सने जडेजाला अनफॉलो केले आहे. त्यातच ८ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात जडेजाला चेन्नईच्या अंतिम ११ जणांच्या संघात जागा मिळाली नव्हती. यामागे तो पूर्णपणे फिट नसल्याचे कारण सांगण्यात आले होते.

त्याचमुळे त्याच्यात आणि फ्रँचायझी यांच्यात काही वाद झाल्याचाही कयास सध्या लावला जात आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाबद्दल कोणतीही स्पष्ट किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

CSK
Photo Courtesy: Instagram/Chennai Super Kings

जडेजाने सोडले कर्णधारपद
आयपीएल २०२२ हंगामापूर्वी (IPL 2022) धोनीने (MS Dhoni) चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवली होती. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही खालावली. त्यामुळे जडेजाने पहिल्या ८ सामन्यात नेतृत्व केल्यानंतर वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी पुन्हा कर्णधार झाला. याच कारणामुळे जडेजाचे चेन्नई फ्रँचायझीबरोबर खटके उडाल्याची चर्चा आहे.

जडेजाची कामगिरी
जडेजाची चेन्नईचे नेतृत्व करताना वैयक्तिक कामगिरी मात्र खालावलेली दिसली. त्याने ८ सामन्यात चेन्नईचे नेतृत्व करताना फलंदाजीत ११२ धावा केल्या. तसेच केवळ ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणातही त्याच्याकडून चूका होताना दिसल्या होत्या. दरम्यान, जडेजाने आयपीएल २०२२ मध्ये १० सामने खेळले असून ११६ धावा केल्या आहेत. तसेच ५ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पुष्पा फिवर कमी होईना! आता तर नेपाळच्या महिला क्रिकेटपटूनेही केले ‘झुकेगा नहीं’ सेलिब्रेशन

राशिद खान ‘हा’ पराक्रम करणारा जगातील तिसराच गोलंदाज, एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

IPL 2022 | गुजरातने प्लेऑफ गाठले; अन्य ३ जागांसाठी कसे आहे समीकरण, घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---