IPL 2024 । विराटच्या चाहत्याला सुरक्षारक्षकांकडून प्रसाद, मैदानातून बाहेर नेल्यानंतर काय घडला पाहाचइंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार संघ मानला जात आहे. हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सीएसकेने सलग दोन विजय मिळवले आहेत. ऋतुराज गायकवाड सीएसकेचा नवा कर्णधार आहे. पण पडद्यामागून एमएस धोनी बऱ्याच गोष्टी सांभाळत आहे. संघातील युवा खेळाडूंना धोनीचे मार्गदर्शन नेहमीच लाभदायक ठरले आहे. श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
आयपीएलमध्ये युवा खेळाडूंना देशातील आणि विदेशातील दिग्गजांसोबत खेळण्याची संधी मिळते. हाच अनुभव पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या युवा खेळाडूंसाठी महत्वाचा ठरतो. एमएस धोनी (MS Dhoni) अगदी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून (2008) सीएसकेचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने सर्वाधिक 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असून अनेक युवा खेळाडूंची कारकीर्द घडली आहे.
युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना (Matheesha Pathirana) आयपीएल 2023 मध्ये सीएसकेचा भाग बनला. पहिल्याच हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. हा हंगाम संपल्यानंतर श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी दिली गेली. धोनीच्या मार्गदर्शनात कारकीर्द घडणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये आता मथिशा पथिराना हे नाव देखील जोडले गेले आहे. आयपीएल 2024 आधी पथिरानाला हॅमट्रींगची दुखापत झाली होती. पण हंगामातील दुसऱ्याच सामन्यासाठी वेगवान गोलंदाज फिट झाला.
मंगळवारी (26 मार्च) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पथिरनाने एक विकेट घेतली आणि सीएसकेच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. याच सामन्याआधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओत पथिराना चेंडू भर मैदानात धोनीच्या पाया पडताना दिसत आहे. धोनी देखील त्याच्याकडे पाहून हसला आणि त्याला आशिर्वाद दिला. चाहत्यांसाठीही धोनीचे हे रुप नवीनच असल्याने या व्हिडिओची विशेष चर्चा होत आहे.
Pathirana Taking Blessings from MS Dhoni Before Bowling is So Wholesome!! 🥹💛 pic.twitter.com/xPVFkOrsf4
— DIPTI MSDIAN (@Diptiranjan_7) March 27, 2024
दरम्यान, सीएसकेने या सामन्यात गुजरातला पराभूत 63 धावांनी मात दिली. प्रथम फलंदाजी करताना सीएकसेने 6 बाद 206 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 8 विकेट्सच्या नुकसानावर 143 धावा केल्या. ऋतुहाजच्या नेतृत्वातील सीएसके संग हंगामातील पहिल्या आठ सामन्यांनंतर पहिल्या क्रमांकावर आहे. सीएसकेला आपला पुढचा सामना रविवारी (31 मार्च) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. (Pathirana Taking Blessings from MS Dhoni Before Bowling is So Wholesome)
महत्वाच्या बातम्या –
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीला सुरुवात
हैदराबादपुढे सगळे सपाट! 20 षटकात 277 धावा कुटल्या आणि मोडला आरसीबीचा महाविक्रम