आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा 10 धावांनी पराभव केला. चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन याच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ टिकू शकला नाही. कर्णधार म्हणून एमएस धोनीला पुन्हा अपयश आले. या हंगामातील हा चेन्नईचा चौथा पराभव आहे. या लेखात आपण चेन्नईच्या पराभवाची 5 कारणे पाहाणार आहोत.
१. चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान 12 व्या षटकापर्यंत संघाची स्थिती मजबूत होती. अनुभवी फलंदाज अंबाती रायडू 13 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला, त्यानंतर एमएस धोनी फलंदाजीसाठी आला, त्याला 12 चेंडूंत फक्त 11 धावा करता आल्या. धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 47 चेंडूत 69 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे 8 गडी बाकी होते. पण जेव्हा तो बाद झाला तेव्हा चेन्नईला 39 धावांची गरज होती आणि 21 चेंडू शिल्लक होते. धोनी क्रीजवर असताना 26 चेंडू फेकले गेले, ज्यावर केवळ 30 धावा निघाल्या. यामुळेच चेन्नई संघ दडपणाखाली आला.
२. कर्णधार एमएस धोनीप्रमाणेच केदार जाधवनेदेखील खूप संथ फलंदाजी केली. 12 चेंडूंत केवळ 7 धावा करून तो नाबाद राहिला. जाधव फलंदाजीसाठी आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 21 चेंडूत 39 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे 6 गडी शिल्लक होते. जाधवने यातील अर्ध्याहून अधिक चेंडूचा सामना केला आणि केवळ 7 धावा केल्या. त्याने खेळलेल्या 12 चेंडूंपैकी केवळ 4 चेंडूंवर धावा केल्या उर्वरित 8 चेंडूवर त्याने एकही धाव घेतली नाही. अशा परिस्थितीत इतर फलंदाजांवर दडपण वाढत गेले. रवींद्र जडेजाने (8 चेंडूत 21 धावा) काही मोठे फटके खेळले, पण त्याला फटकेबाजी करण्याची संधी फार उशीरा मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
३. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी त्याचा प्रतिस्पर्धी कर्णधार दिनेश कार्तिकच्या जाळ्यात अडकला. दिनेश कार्तिकने आपला हुकमी एक्का आणि स्टार फिरकीपटू सुनील नरेनला शेवटच्या षटकात गोलंदाजी दिली. एमएस धोनी सुरुवातीला मोठे फटके खेळत नाही, याचा फायदा नरेनने घेतला आणि उत्कृष्ट गोलंदाजी करून त्याने सीएसकेवर दबाव आणला. धोनी स्वत: फलंदाजीसाठी येण्याऐवजी अष्टपैलू सॅम करन किंवा ड्वेन ब्राव्होला संधी देऊ शकला असता पण त्याने असे केले नाही.
४. वास्तविक म्हणजे कोलकाताने चेन्नईला केवळ त्यांच्या रणनीतीनेच पराभूत केले नाही तर त्यांच्या खेळाडूंनीही योजना योग्य पद्धतीने अंमलात आणल्या. विशेषतः सुनील नरेन आणि आंद्रे रसल यांनी गोलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर योजनेनुसार गोलंदाजी केली आणि फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव वाढला आणि कोलकाताचा विजयाचा मार्ग सोपा झाला.