आयपीएल 2020 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. या सामन्यादरम्यान झालेल्या खास आकडेवारीवर आपण नजर टाकणार आहोत.
• कोलकाताविरुद्ध चेन्नईचा हा 15 वा विजय होता. यापूर्वी या दोन संघांत एकूण 24 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 14 सामने चेन्नईने जिंकले होते आणि केकेआर संघाने 9 सामने जिंकले होते.
• आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा हा 5 वा विजय होता. या हंगामात 5 सामने जिंकणारा चेन्नई 8 वा संघ ठरला.
• आयपीएल 2020 मध्ये कोलकाताचा 7 वा पराभव झाला. या हंगामात 7 सामने गमावणारा तो चौथा संघ ठरला आहे. केकेआरपूर्वी चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद संघांनी या हंगामात 7 सामने गमावले आहेत.
• कोलकाताचा सलामीवीर नितीश राणाने 61 चेंडूत 87 धावा केल्या. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीचे 11 वे अर्धशतक होते.
• वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरेनने आपल्या टी20 कारकिर्दीतील 350 वा सामना खेळला. टी20 क्रिकेटमध्ये 350 सामने खेळणारा तो 9 वा खेळाडू बनला आहे.
• चेन्नईचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावा केल्या. आयपीएल कारकिर्दीतील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. हे दोन अर्धशतक सलग 2 सामन्यात आले आहेत.
• चेन्नईचा सलामीवीर ऋतुराजने 72 धावा केल्या. ही त्याचा आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.
• चेन्नईच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सने 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.
चेन्नईचा पुढील सामना रविवारी (1 नोव्हेंबर) किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सीएसकेच्या ‘या’ खेळाडूबद्दल सचिनने केलेली भविष्यवाणी ठरली खरी; म्हणाला होता…
-लॉकडाऊनमध्ये पत्नीसोबत केला टेरेसवर फलंदाजीचा सराव, आता आयपीएलमध्ये धुतोय गोलंदाजांना
-बाप रे बाप! साक्षी धोनीने चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे केले कौतुक
ट्रेंडिंग लेख-
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान