आयपीएल २०२१ चा ३० वा सामना रविवारी(१९ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघांसह या मोसमाचा दुसरा टप्पा सुरू होईल. भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली होती. आता त्यांचा यूएईमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. गुणतालिकेमध्ये चेन्नई सध्या दुसऱ्या स्थानावर आहे आणि मुंबई चौथ्या स्थानावर आहे.
मुंबईने गेल्या मोसमात यूएईमध्ये चेन्नईचा पराभव केला होता. एमएस धोनीच्या चेन्नईसाठी शेवटचा हंगाम वाईट ठरला होता. जर आपण दुबईच्या हवामानाबद्दल बोललो, तर खूप गरम हवामानाची शक्यता आहे. तसेच रात्रीच्या वेळी गार हवामान असेल. त्यामुळे दुबईचे हवामान खेळाडूंना खूप त्रास देऊ शकते.
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किए याने तर इथे उष्णता खूप जास्त असल्याचे सांगितले आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत तापमान नक्कीच कमी होत जाईल.
अशा परिस्थितीत, फिरकीपटू सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि दोन्ही संघांसाठी निर्णायक घटक ठरतील. खेळपट्टी मंदावल्यानंतर सामन्याचा उत्तरार्ध फिरकीपटूंसाठी अनुकूल ठरेल. या खेळपट्टीवर १७० ची धावसंख्या चांगले लक्ष्य मानले जाते. दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजी विभागाबद्दल बोलायचे झाले, तर चेन्नईचा संघ रोहित शर्माच्या मुंबईवर वर्चस्व गाजवू शकतो. कारण, त्यांच्याकडे रवींद्र जडेजा आणि इम्रान ताहिरसारखे गोलंदाज आहेत, तर मुंबईकडे राहुल चाहर हा फिरकीपटू आहे.
तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीने आठपैकी सहा सामने जिंकत १२ गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल चेन्नईचा संघ आहे त्यांनी १० गुण मिळवले आहेत तर तिसऱ्या स्थानी आरसीबीचा संघ आहे त्यांनी १० गुण मिळवले आहेत, पण आरसीबीचा नेटरनरेट सीएसकेपेक्षा कमी असल्याने ते तिसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी आठ गुण मिळवून मुंबईचा संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईला अव्वल स्थान गाठण्याची संधी, तर मुंबई आरसीबीला टाकू शकते मागे, पाहा गुणतालिकेचे समीकरण
आरसीबीसाठी खेळताना ‘या’ युवा खेळाडूने जिंकला विराटचा विश्वास, भविष्यात पंत-किशनला देईल टक्कर