fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा कर्णधार म्हणतो, संघ व्यवस्थापनाच्या आवडीनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो

Csk vs mi mumbai indians captain rohit sharma talks about his batting position in ipl

September 18, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

Photo Courtesy: Twitter/ mipaltan


इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि गतवर्षीचा उपविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात खेळला जाणार आहे.
प्रत्येक संघात सामन्याच्या आधी फलंदाजीचा क्रम ठरवला जातो. परिस्थितीनुसार त्यात बदल सुद्धा होतो. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये जास्तीत जास्त वेळा मधल्या फळीत फलंदाजीसाठी आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाज मानला जाणारा रोहित या आयपीएल स्पर्धेपूर्वी आपल्या फलंदाजीच्या क्रमाविषयी बोलला.रोहित म्हणाला की फलंदाजीच्या क्रमासंदर्भात तो सर्व पर्याय खुले ठेवेल.

मागच्या हंगामात रोहित सलामीला आला होता आणि त्याचा संघ चॅम्पियनही झाला होता. संघ व्यवस्थापनाच्या आवडीनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो असे रोहितने म्हटले होते. व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला, “गेल्यावर्षी मी संपूर्ण स्पर्धेत सलामीला फलंदाजी केली होती. मी सर्व पर्याय खुले ठेवत आहे, जिथे संघाला माझी आवश्यकता असेल त्या क्रमांकावर मी फलंदाजी करेन.”

पुढे बोलतांना तो म्हणाला, “मला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते, मी बर्‍याच वर्षांपासून हे करत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे. जेव्हा मी भारतीय संघाकडून खेळतो, तेव्हा मी फलंदाजीच्या क्रमाचे सर्व पर्याय खुले ठेवण्यास व्यवस्थापनाला सांगतो. मी आयपीएलमध्येही तेच करेन.”

2017 आणि 2018 मध्ये रोहित 30 डावांपैकी केवळ दोन डावांमध्ये सलामीला आला होता. रोहितने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याला फारसे यश मिळू शकले नव्हते. आयपीएलचे हे दोन हंगाम रोहितच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट हंगाम होते.

मुंबई इंडियन्स संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डि कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पंड्या, कायरान पोलार्ड, राहुल चहर , ख्रिस लिन, हार्दिक पंड्या, शेरफन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंग, मोहसिन खान, मिचेल मॅक्लेनघन, प्रिन्स बलवंतराय सिंग, सुचित रॉय, ईशान किशन.

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे वेळापत्रक:

19 सप्टेंबर – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – अबू धाबी
23 सप्टेंबर- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – अबू धाबी
28 सप्टेंबर – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – दुबई
1 ऑक्टोबर – विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – अबू धाबी
4 ऑक्टोबर – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – शारजाह
6 ऑक्टोबर – विरुद्ध राजस्थान रॉयल्स – अबू धाबी
11 ऑक्टोबर – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – अबू धाबी
16 ऑक्टोबर – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – अबू धाबी
18 ऑक्टोबर – विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – दुबई
23 ऑक्टोबर – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – शारजाह
25 ऑक्टोबर – विरुद्ध राजस्थान रॉयल्स – अबू धाबी
28 ऑक्टोबर – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर -अबू धाबी
31 ऑक्टोबर – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – दुबई
3 नोव्हेंबर – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद –  शारजाह

4 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी होणारे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. इतर सर्व सामने रात्री 7.30 वाजता सुरु होईल.


Previous Post

असे ३ खेळाडू, जे दिल्ली कॅपिटल्स संघाला मिळवून देऊ शकतात पहिले आयपीएल विजेतेपद

Next Post

जोफ्रा आर्चरची ‘ती’ चूक इंग्लंडला पडली भलतीच महागात

Related Posts

क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

भारत-इंग्लंड मालिकेला नाव दिलेले ‘ऍन्थनी डी मेलो’ आहेत तरी कोण?

January 26, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

भारताविरुद्धच्या दौऱ्यातून संघाबाहेर काढल्याने बेअरिस्टोची घेतली डीकेवेलाने फिरकी, म्हणाला….

January 26, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic
टॉप बातम्या

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव, पंजाबचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

January 26, 2021
Next Post
Photo Courtesy: Facebook/ICC

जोफ्रा आर्चरची 'ती' चूक इंग्लंडला पडली भलतीच महागात

Photo Courtesy: Twitter/ ICC

दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नव्या भूमिकेत

Photo Courtesy: Twitter/ IPL

मुंबई इंडियन्स संघात फिनिशरची भूमिका कोण निभवणार? प्रशिक्षकाने दिले उत्तर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.