आयपीएल २०२१ मध्ये आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने-सामने येतील. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. एकीकडे चेन्नई सुपर किंग्जला सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पराभव स्विकारावा लागला होता. मात्र दुसर्या सामन्यात त्यांनी पुनरागमन करत पंजाब किंग्जला ६ विकेट्सने पराभूत केले होते.
राजस्थान रॉयल्सला देखील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज विरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. मात्र दुसर्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला थरारक लढतीत मात देत हंगामातील पहिला विजय मिळविला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात हीच विजयी लय कायम राखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. या दोन्ही संघांची आजच्या सामन्यातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असेल, हे आपण जाणून घेऊया.
चेन्नई सुपर किंग्ज –
मागील सामना जिंकल्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघात बदल होणे, कठीण आहे. कारण कर्णधार एमएस धोनी नेहमीच विजयी संघ कायम ठेवण्याला प्राधान्य देतो. मात्र सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या स्थानाचा पुनर्विचार चेन्नईचे संघ व्यवस्थापन करू शकते. मागील दोन्ही सामन्यात त्याला काही खास कामगिरी करण्यात अपयश आले होते.
त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या जागी अनुभवी रॉबिन उथप्पाला संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो. तसेच वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी निवडीसाठी उपलब्ध असेल. मात्र उर्वरित चारही परदेशी खेळाडूंनी समाधानकारक प्रदर्शन केल्याने त्याचा संघात समावेश केला जाणार नाही.
चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
रॉबिन उथप्पा, फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक) , सॅम करन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर
राजस्थान रॉयल्स –
यंदाच्या हंगामात नवनिर्वाचित कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळत असलेल्या राजस्थानने सुरुवात तर चांगली केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांना पंजाब विरूद्ध निसटता पराभव पत्करावा लागला होता. मात्र दिल्लीला त्यांनी सांघिक कामगिरीच्या जोरावर मात दिली होती.
अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र त्याच्या जागी संधी मिळालेल्या डेव्हिड मिलरने मागच्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. तसेच श्रेयस गोपाळच्या जागी संधी दिलेल्या जयदेव उनाडकटने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी हाच विजयी संघ राजस्थान कायम ठेवेल.
राजस्थानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
मनन व्होरा, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवाटिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्तफिझुर रहमान
महत्वाच्या बातम्या:
सहकार्यांना साथ देण्यासाठी वॉर्नर आणि विलियम्सनने पाळले रोजे, राशिद खान व्हिडिओ शेअर करत म्हणाला
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाला बापमाणसाकडून हिरवा कंदील, प्रतिक्रिया वाचून तुमचीही पटेल खात्री!
हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे; इंग्लिश दिग्गजाने व्यक्त केली चिंता