---Advertisement---

ग्रँड वेलकम! एमएस धोनीने केले पुजारासह ७ नव्या खेळाडूंचे चेन्नई संघात खास स्वागत, पाहा फोटो

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 12:25 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला उद्यापासून(९ एप्रिल) सुरुवात होत आहे. या हंगामाच ३ वेळचे विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा पहिला सामना १० एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल. त्यामुळे या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या संघात यंदा नव्याने दाखल झालेल्या खेळाडूंचे खास स्वागत केले आहे.

चेन्नई संघात ७ नवे खेळाडू 
आयपीएल २०२१ हंगामासाठी चेन्नईने त्यांच्या संघात ७ नव्या खेळाडूंचा समावेश केला आहे. चेन्नईने लिलावापूर्वी ६ खेळाडूंना मुक्त केले होते. त्यामुळे एकूण ७ खेळाडूंसाठी चेन्नई संघात जागा रिकामी झाली होती. तसेच चेन्नईने लिलावापूर्वी रॉबिन उथप्पाला ट्रेडिंह विंडोद्वारे राजस्थान रॉयल्सकडून आपल्या संघात सामील करुन घेतले होते.

त्याचबरोबर लिलावात चेन्नईने ६ खेळाडूंना खरेदी केले आहे. यात इंग्लंडचा मोईन अली, भारताचे कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, के भगत वर्मा, सी हरी निशांत आणि एम हरिशंकर रेड्डी यांना खरेदी केले आहे.

नव्या खेळाडूंचे स्वागत 
चेन्नईने संघात नव्याने दाखल झालेल्या या ७ खेळाडूंचे बुधवारी संघाचे अधिकृत किट देऊन स्वागत केले आहे. हे किट चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. या स्वागत सोहळ्याचे फोटो चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करण्यात आले आहेत.

पुजारा ७ वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज
कसोटीपटू म्हणून नाव कमावलेल्या पुजाराला चेन्नईने ५० लाख रुपयांना खरेदी केले. त्यामुळे ७ वर्षांनंतर पुजाराचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे. यापूर्वी तो २०१४ साली शेवटचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला होता.

चेन्नई संघात यंदा तो देखील नव्याने दाखल झाल्याने त्याचेही स्वागत एमएस धोनीने किट देऊन केले. याबद्दल पुजाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याने ट्विट केले आहे की ‘एमएस धोनीकडून आणि चेन्नई सुपर किंग्स कुटुंबाकडून अधिकृत किट मिळाल्याबद्दल अभिमान आणि आनंद वाटत आहे. एका चांगल्या हंगामासाठी वाट पाहात आहे.’

चेन्नईला यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा –
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या १३ व्या हंगामात खुपच निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यांना १४ सामन्यांमधील केवळ ६ विजयांसह गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे यंदा मात्र चेन्नईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ –
एमएस धोनी (कर्णधार) , फाफ डू प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरी निशांत.

महत्त्वाच्या बातम्या –

आरसीबीसाठी जॅकपॉट ठरणार ‘हा’ खेळाडू? केवळ ४९ चेंडूत झळकावल्यात १०४ धावा 

मागील हंगामाप्रमाणे १४ व्या आयपीएल हंगामातही चेन्नई प्लेऑफमध्ये पोहणार नाही, ‘या’ तीन दिग्गजांचा दावा

“पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असणे म्हणजे नेहमीच ४० चेंडूत शतक करणे नव्हे”, इंग्लंडच्या क्रिकेटरने सुनावले खडेबोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---