---Advertisement---

CSK vs PBKS | कर्णधार जडेजाने जिंकली नाणेफेक, पंजाबकडून २ खेळाडूंचे पदार्पण; पाहा उभय संघ

On: रविवार, एप्रिल 3, 2022 7:12 PM
Ravindra-Jadeja-Mayank-Agarwal
---Advertisement---

रविवारी (०३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार आहे. हा सामना जिंकत चेन्नई हंगामातील त्यांचे विजयाचे खाते उघडण्यासाठी आतुर असेल. तर पंजाबचा संघ त्यांचा दुसरा विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असेल. उभय संघांचा हा हंगामातील तिसरा सामना आहे.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार असून तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

https://twitter.com/IPL/status/1510611836898471937?s=20&t=Q_sVXagPq3qde83VDpsA1Q

या सामन्यात पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. पंजाबकडून जितेश शर्मा आणि वैभव अरोरा या खेळाडूंचे पदार्पण झाले आहे. वैभवला हरप्रीत ब्रारच्या जागी संधी दिली गेली आहे. तर राज बावाच्या जागी जितेश प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी झाला आहे. तर चेन्नई संघात केवळ १ बदल आहे. तुषार देशपांडेला बाहेर करत ख्रिस जॉर्डनला संघात जागा दिली गेली आहे.

https://twitter.com/IPL/status/1510613557162827779?s=20&t=Q_sVXagPq3qde83VDpsA1Q

असे आहेत उभय संघ-

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी

महत्त्वाच्या बातम्या-

वर्ल्डकप फायनल मास्टर्स! हिलीचे मॅरेथॉन दीडशतक; गिलख्रिस्ट, पाँटिंग, रिचर्ड्ससारख्या पुरुषांवर वरचढ

‘या’ खेळाडूची ‘ती’ ओव्हर ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर, नाहीतर उपविजेता इंग्लंड आज विश्वविजेता असता!

‘एकच स्वप्न, आयपीएलच्या पैशातून आई-वडिलांसाठी घ्यायचंय घर’, १९ वर्षीय तिलक वर्माने सांगितली संघर्षगाथा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---