---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जला सचिनच्या चाहत्यांनी खडसावले!

On: गुरूवार, मे 3, 2018 8:24 PM
---Advertisement---

दोन वर्षाच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये चांगलेच पुनरागमण केले आहे. सध्या सुरू असलेल्या मोसमात चेन्नई 8 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे.

कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली असलेल्या या संघाचे चाहते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. याचे काही श्रेय त्यांचे सोशल मिडीया हॅण्डल करणाऱ्यांनाही जाते.

मात्र मागील काही दिवसांत त्यांनी केलेल्या खळबळजनक पोस्टने ते चर्चेत आले आहे.

सचिन तेंडूलकर आणि सुरेश रैना यांचा सोबत चालतानाचा फोटो त्यांनी ट्विटरवरून शेयर केला. या फोटोला त्यांनी ‘रमेश आणि सुरेश’ असे लिहून शेवटी लव्ह इमोजी दिली होती. या दोन्ही नावांचा वापर फाईव्ह स्टार कॅटबरीच्या जाहिरातीत होतो. तसेच रमेश हे सचिनच्या वडिलांचे नाव आहे.

या महान फंलदाजाला त्याच्या वडिलांच्या नावावरून संबोधने हे चाहत्यांना रूचले नाही.

या ट्विटरमुळे चाहते खूपच निराश झाले आहेत. हे ट्विट चेन्नईच्या सोशल मिडीयाने पुण्यामध्ये झालेल्या चेन्नई विरूध्द मुंबई या सामन्यानंतर केले होते. हा सामना मुंबईने 8 विकेट्सने जिंकला होता.

https://twitter.com/AjitCJawale/status/991305287691784194

https://twitter.com/imsunilthorat/status/990875654282346501

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment