ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा मायदेशात भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे खापर अनेकांनी प्रामुख्याने कर्णधार टीम पेनवर फोडले आहे. त्याच अनुषंगाने, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पेनला कर्णधारपदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादृष्टीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक मोठे पाऊल टाकणार आहे.
कमिन्स बनू शकतो पुढचा कर्णधार
ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य वृत्तपत्र’सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार, ‘भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर नियमित कर्णधार टीम पेनला त्याच्या पदावरून हटविण्यात येईल, असे म्हटले जात होते. त्याच्याकडून ही जबाबदारी वेगवान गोलंदाज व उपकर्णधार पॅट कमिन्स याच्याकडे दिले जाईल, अशी बातमी होती. त्यादृष्टीने न्यू साउथ वेल्स संघाच्या कर्णधारपदी लवकरच कमिन्सची नियुक्ती करण्यात येईल. सध्या न्यू साउथ वेल्सचे नेतृत्व यष्टिरक्षक पीटर नेव्हिल करत आहे.’
कमिन्सने दिली होती कर्णधारपदाबाबत प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी कमिन्सने कर्णधारपदाविषयी एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “मी हे जाणण्यासाठी उत्सुक आहे की, मी संघाचे नेतृत्व करणार की नाही. मला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. इंग्लंडमध्ये काही सराव सामन्यांव्यतिरिक्त मी १६ वर्षाखालील संघाचे नेतृत्व केले होते.”
ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आहे कमिन्स
पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारच्या संघाचा उपकर्णधार आहे. तसेच, कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत तो बर्याच काळापासून अव्वल स्थानी विराजमान झालेला दिसतो. भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या मालिकेत ऑस्ट्रेलियाला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाला व्हावे लागले पराभूत
ऑस्ट्रेलियाला नुकत्याच संपलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत २-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या सामन्यातील ऐतिहासिक पराभवानंतर, नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने झुंजार खेळ दाखवत मेलबर्न व ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवले होते.
महत्वाच्या बातम्या:
सध्या चर्चेत असलेल्या रिहानाचे ख्रिस गेलशी आहे खास नाते, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल
कुलदीप यादवला संघात स्थान न दिल्याने गंभीरची संघ व्यवस्थापनावर टीका; म्हणाला