---Advertisement---

कुलदीप यादवला संघात स्थान न दिल्याने गंभीरची संघ व्यवस्थापनावर टीका; म्हणाला…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 7:18 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेचा एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच आता इंग्लंड विरुद्ध शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटीतही फिरकीपटू कुलदीप यादवला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचाही समावेश आहे.

गंभीरने भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली असून पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले आहे की, ” खरं सांगायचं झालं तर कुलदीपसाठी ती दुर्दैवाची गोष्ट आहे. मला वाटलं होतं की कुलदीपला इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये खेळायची संधी मिळेल. मनगटाचा वापर करणारे फिरकीपटू फार दुर्मिळ असतात आणि अनेकदा आपण पाहिले आहे की ते खेळ पालटू शकतात. कदाचीत त्यांना सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची आवश्यक असेल. माझ्यासाठी आश्चर्याची बाब म्हणजे इशांत शर्मा आहे, त्याने सर्वात जास्त कसोटी सामने खेळलेले नाहीत ना’

इंग्लंड विरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक अरुण भारत आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासह कर्णधार विराट कोहलीने देखील कुलदीप यादव भारतीय क्रिकेट संघाचा भाग असल्याचं सांगितलं होतं. मात्र मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लइंग इलेव्हनमध्ये संघ व्यवस्थापनाने आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम या फिरकी गोलंदाजांना संधी दिली असली तरी गंभीर या रणनीतीशी सहमत नसल्याने त्याने संघ व्यवस्थापनावर केली आहे.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणारे भारताचे खेळाडू
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार,) रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत खेळलेले ‘हे’ ५ भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर

रूटने भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले! केविन पीटरसन म्हणाला, “आज विराटला ‘या’ खेळाडूची नक्की आठवण येत असेल”

…म्हणून इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान दंडाला बांधली काळी पट्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---