---Advertisement---

रूटने भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले! केविन पीटरसन म्हणाला, “आज विराटला ‘या’ खेळाडूची नक्की आठवण येत असेल”

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 6:47 PM
---Advertisement---

चेन्नई येथे आज पासून(5 फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघामध्ये बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने शानदार कामगिरी केली. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व एक शानदार शतक झळकावले.

रुटच्या या खेळीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. अशाच वेळी इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केविन पीटरसनने रुटच्या खेळीचे कौतुक करतच, भारतीय कर्णधार विराट कोहलीला फिरकीपटू रवींद्र जडेजाजी कमी जाणवत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

पिटरसनने ट्विट करत लिहिले, “विराटला नक्कीच जडेजाची आठवण येत असेल.” दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की दुखापतग्रस्त असल्याने जडेजा मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यातून बाहेर झालेला आहे. त्याच्या जागी संघात खेळत असलेला शहाबाज नदीम पहिल्या दिवशी फार महागडा ठरला.

https://twitter.com/KP24/status/1357638869282414592

दरम्यान सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो इंग्लंडचा कर्णधार जो रुटने. रुटने 197 चेंडूत 14 चौकार व 1 षटकारासह 128 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 89.3 षटकात 3 गडी गमावत 263 धावन पर्यंत मजल मारली आहे. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर डॉम सिबली 87 धावा करून बाद झाला असला तरी, रुट अजूनही नाबाद असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

मैदानावर वेदनेने विव्हळत होता इंग्लंडचा कर्णधार, विराटने खिलाडूवृत्ती दाखवत जिंकली चाहत्यांची मने; पाहा कौतुकास्पद व्हिडिओ

कमी वयात १०० वा कसोटी सामना खेळणारा जो रुट तिसरा क्रिकेटर; जाणून घ्या कोण आहेत पहिले २ खेळाडू

ब्रेकिंग! प्रसिद्ध फुटबॉलपटू आंद्रे ओन्नावर एका वर्षाची बंद, हे आहे कारण   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---