अजॅक्सचा गोलकीपर आंद्रे ओन्ना याची ड्रग्स चाचणी पॉझिटीव्ह आढळल्याने यूइएफएने (UEFA) त्याच्यावर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. ३० ऑक्टोबर २०२० रोजी त्याच्या शरीरात फ्युरोसेमाइड, डायुरेटिक असे प्रतिबंधक पदार्थ सापडले होते. त्यामुळे यूइएफएने आजपासून (५ फेब्रुवारी) पुढील १२ महिन्यांसाठी क्लब आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांतून त्याला निलंबित केले आहे.
कोण आहे ओन्ना ?
ओन्ना हा २०१६-१७ या हंगामापासून अजॅक्सचा पहिल्या पसंतीचा गोलकीपर आहे. २०१५ साली बार्सिलोना अकादमीतून तो अजॅक्स क्लबमध्ये सहभागी झाला होता. याचबरोबर तो कॅमेरून राष्ट्रीय फुटबॉल संघाचा नियमित सदस्य असून त्याने १८ कॅप्स जिंकल्या आहेत. याचबरोबरच त्याला फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट युवा गोलकीपरमध्ये गणले जाते. त्याने चेल्सी आणि बोरुसिया डॉर्टमंड अशा युरोपियन क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु आता त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आल्यामुळे तो आफ्रिकन कप ऑफ नेशन्स २०२१ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
नक्की कशामुळे घातली बंदी ?
अजॅक्स क्लबने दिलेल्या माहितीनुसार, ओन्नाने तब्येत खराब असल्यामुळे चुकीने त्याच्या पत्नीने लिहून दिलेली काही औषधे घेतले. त्यानंतर तो ड्रग्स चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता. फुटबॉल संघटनेची शिस्तबद्ध तुकडीने ओन्नाने मुद्दाम असे केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु युरोपियन फुटबॉल संघटनेच्या अँटी-डोपिंग नियमानुसार, कोणत्याही फुटबॉलपटूचे कर्तव्य असते की त्याने प्रतिबंधक पदार्थांचे चुकूनही सेवन करू नये. याच कारणामुळे ओन्नावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अबब! लिओनेल मेस्सीला बार्सिलोनाच्या करारातून मिळणारी किंमत ऐकून व्हाल थक्क
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीची पिछाडीवरून ब्लास्टर्सवर मात
प्रेयसीचा वाढदिवस साजरा करणं रोनाल्डोला पडलं महागात, होऊ शकतो ‘इतक्या’ रुपयांचा दंड