---Advertisement---

प्रेयसीचा वाढदिवस साजरा करणं रोनाल्डोला पडलं महागात, होऊ शकतो ‘इतक्या’ रुपयांचा दंड

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 12:57 PM
---Advertisement---

प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर कोविड-१९च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. रोनाल्डोने आपली प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्ज हिच्यासोबत मिळून प्रवासबंदी असतानाही इटलीमध्ये सैर केली. यामुळे आता रोनाल्डो मोठ्या संकटात सापडला आहे.

प्रेयसीच्या वाढदिवसासाठी केले खटाटोप 

झाले असे की, इटलीचा फुटबॉल क्लब जुवेंट्सचा स्टार स्ट्राइकर रोनाल्डो याची प्रेयसी जॉर्जिना हिचा बुधवारी (२७ जानेवारी) वाढदिवस होता. त्यामुळे दोघेही इटलीच्या उत्तर पश्चिम भागातील वाले-डि-ऑस्ट्रामध्ये स्थित माउंटेन रिजोर्टमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. यादरम्यानचा एक व्हिडिओ जॉर्जिनाने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या रिजॉर्टजवळील बर्फाळ जागी दोघे मस्ती करताना दिसत होते. काही काळानंतर तिने हा व्हिडिओ डिलिट केला होता. परंतु तोवर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पोलिसांचा तपास सुरू

रोनाल्डो इटतीलील पीडमोंट भागात राहतो. सध्या इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे विनाकारण प्रवास करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तरीही रोनाल्डोने आपल्या प्रयसीसोबत प्रवास केला. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिस रोनाल्डोच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासाठी त्याला ४०० यूरोंचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. जुवेंट्स क्लबने यासंदर्भात टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट प्रमाणे फुटबॉलमध्येही असणार कन्कशन सब्सटिट्यूट, ‘या’ टूर्नामेंटपासून होणार सुरुवात 

आयएसएल २०२०-२१ : हैदराबादची अखेरच्या पाच मिनिटांत बेंगळुरूविरुद्ध बरोबरी

आयएसएल २०२०-२१ : नाट्यमय लढतीत गोवा-ईस्ट बंगाल बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---