वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोज यांनी भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनवर केलेल्या टीकेबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरचा बचाव केला आहे. मांजरेकरांनी अश्विनला क्रिकेटचा सर्वकालिन महान खेळाडू म्हणण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या विरोधी भाष्यामुळे त्यांच्यावर टीकेची झुंबडही उडाली होती.
या विवादात मांजरेकरांची बाजू घेत एम्ब्रोज यूट्यूब शोवर म्हणाले, “आपल्या सर्वांची मते वेगवेगळी आहेत आणि आम्ही सर्व महानतेकडे वेगळ्या प्रकारे पाहतो. मांजरेकर हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू होते. त्यांचे स्वतःचे मत आहे आणि आपल्या सर्वांचे स्वतःचे मत असते. पण आपण महानता कशी परिभाषित करू शकता यावर आपले मत अवलंबून असते.”
ते म्हणाले, “कधीकधी आपण मोठेपणाला विलंब म्हणून वापरतो, म्हणून आपण महानता कशी परिभाषित करतो यावर लक्ष दिले पाहिजे. माझ्या मते, महानता ती असते जेव्हा खेळाडू आपल्या काळात अनेक वर्षे लयीमध्ये राहतो. फक्त एक किंवा दोन वर्ष नव्हे.”
कर्टली एम्ब्रोजने वेस्टच्या इंडिजसाठी ९८ कसोटी सामन्यांमध्ये ४०५ बळी आणि १७६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२५ बळी घेतले आहेत.
काय म्हणाले होते संजय मांजरेकर
मांजरेकर म्हणाले होते की, “अश्विनला काही देशांमध्ये एकही डावात पाच बळी घेता आले नाही. जेव्हा लोक अश्विनला खेळाचा सर्वकालिन महान खेळाडू मानतात, तेव्हा मला एक समस्या जाणवते. अश्विनबरोबरची एक मूलभूत समस्या म्हणजे त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकही डावात पाच बळी घेतले नाहीत.”
अश्विन सध्या इंग्लंड दौऱ्यावर
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघ १८ जूनपासून इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. अश्विन हा या सामन्यात हुकुमी एक्का ठरेल असे म्हणण्यात येत आहे. अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी अनेकदा अप्रतिम कामगिरी केली आहे.
अश्विनने आतापर्यंत भारतासाठी ७८ कसोटी सामने खेळले आहे आणि त्यात ४०९ विकेट्स घेतल्या आहे. त्याने एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम ७ वेळेस केला आहे.
महत्वाच्या बातम्या
SLvIND: १८५ची शानदार सरासरी असूनही दुर्लक्ष; हताश शिलेदार म्हणाला, ‘कोणालाच काळजी नाही’
लंका दहन करण्यासाठी मराठमोळा ऋतुराज सज्ज; म्हणाला, ‘आता सर्वोत्कृष्ट द्यायचं’
पाकिस्तानी अष्टपैलूला आयपीएलची ऑफर देण्यासाठी केकेआरचा संघमालक शाहरुखने गाठलं होतं लंडन