---Advertisement---

‘अश्विन नव्हे स्वत:च्या बळावर शिकलो कॅरम बॉल गोलंदाजी,’ नवनियुक्त शिलेदाराची प्रतिक्रिया

On: शनिवार, जून 12, 2021 11:38 AM
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेट खेळणारा खेळाडू लहानपणापासून एक स्वप्न पाहत असतो. ते म्हणजे, पुढे जाऊन मी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळेल. भरघोस मेहनत करून काही खेळाडूंचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे होत नाही. अशातच सध्या कर्नाटकच्या अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतमचे भारतासाठी खेळण्याचे स्वप्न जवळ जवळ पूर्ण झाले आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड झाली असून, तो या दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जुलै १३ ते जुलै २५ या कालावधीत भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध ५ टी-२० सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.

कृष्णप्पा गौतमला सुरुवातीच्या काळात संघाचे सहकारी मस्करी म्हणून ‘भज्जी’च्या नावाने बोलत असत. कृष्णप्पा गौतमने आर अश्विनच्या गोलंदाजीला पाहून गोलंदाजीचे धडे घेतले आहेत. तोसुद्धा अश्विनसारखा ‘कॅरम बॉल’ टाकण्यात माहीर आहे.

हरभजनचा करायचा अभिनय
गौतमने सांगितले कि, “माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातील मी हरभजन सिंगचा अभिनय करायचो आणि माझे सहकारीसुद्धा मला भज्जी नावाने हाक मारत असे. परंतु मी भज्जीसारखा ‘दुसरा’ चेंडू नाही टाकत तर मी ‘कॅरम बॉल’ टाकतो.”

प्रथम श्रेणीत १६६ आणि भारतीय ए संघासाठी ७० आणि टी-२० मध्ये ४१ गडी बाद करणाऱ्या गौतमला विचारले गेले की, तू अश्विनला बघून कॅरम बॉल शिकलास का? तर त्याने सांगितले की, “नाही. मी अश्विनकडून नव्हे तर स्वत:च्या मेहनतीवर कॅरम बॉल टाकायला शिकलो आहे. जर तुम्हाला वरच्यास्थानी क्रिकेट खेळायचे असल्यास तुम्हाला स्वत:च्या मेहनतीवर खेळावं लागतं. माझ्या लहानपणी मला इरापल्ली प्रसन्ना सरांनी प्रशिक्षण दिले आहे.”

माही भाईकडून मिळाला मोलाचा सल्ला
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल विचारल्यास गौतमने सांगितले की, “माही भाईचा सर्वात महत्वाचा सल्ला हाच असतो की, तुम्ही खेळाचा आनंद घ्या. आणि तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ खेळा. जे तुम्ही पूर्वीपासून करत आला आहात.” गौतम पूर्वीपासून भारतीय संघा सोबत दौरे करतो आहे. गेल्या इंग्लंड दौऱ्याला गौतम भारतीय संघाकडून नेट गोलंदाज म्हणून गेला होता.

राहुल द्रविडचे मार्गदर्शन
राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (NCA) प्रमुख राहुल द्रविड येत्या श्रीलंका दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबत जाणार आहेत. गौतमने सांगितले की, “राहुल सरांची उपस्थिती खूप महत्वाची असणार आहे. जरा तुम्ही भारतीय ए संघासाठी खेळला असाल तर, तुम्हाला ठाऊक असेल की एक प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड सर कसे आहेत. त्यांचाकडे खेळाडूंना निरखून घेण्याची क्षमता आहे आणि ते एक चांगला खेळाडू घडवू शकतात.”

महत्त्वाच्या बातम्या-

भारतावर परमाणू बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा पाकिस्तानी क्रिकेटर, ठोकलीत ३१ शतके

SLvIND: १८५ची शानदार सरासरी असूनही दुर्लक्ष; हताश शिलेदार म्हणाला, ‘कोणालाच काळजी नाही’

लंका दहन करण्यासाठी मराठमोळा ऋतुराज सज्ज; म्हणाला, ‘आता सर्वोत्कृष्ट द्यायचं’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---