नॉटिंगघम। आज(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. हा सामना नॉटिंगघममध्ये ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे.
विंडीज आणि पाकिस्तान संघाची ही आहे खास आकडेवारी –
– विंडीज आणि पाकिस्तान संघ आत्तापर्यंत विश्वचषकात 10 वेळा आमने- सामने आले असून यात 7 वेळा विंडीज संघाने विजय मिळवला आहे तर पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे.
– विंडीज आणि पाकिस्तान संघात आत्तापर्यंत विश्वचषकात झालेल्या 10 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ 5 वेळा तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ 5 वेळा जिंकला आहे.
– विश्वचषकात या दोन संघात झालेल्या सामन्यात आत्तापर्यंत फक्त 2 शतके झाली असून एक शतक पाकिस्तानकडून रमीज राजा यांनी तर विंडीजकडून विवियन रिचर्ड्स यांनी एक शतक केले आहे.
– हे दोन संघ इंग्लंडमध्ये विश्वचषकात आत्तापर्यंत 4 वेळा आमने सामने आले असून विंडीजने 3 वेळा तर पाकिस्तानने 1 वेळा विजय मिळवला आहे.
– विंडिज आणि पाकिस्तान हे संघ आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये वनडेत 6 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 5 वेळा विंडीजने तर 1 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आहे.
– आजपर्यंत विंडीज आणि पाकिस्तान हे संघ वनडेमध्ये 133 वेळा आमने – सामने आले आहेत. त्यातील 70 सामन्यात विंडीजने विजय मिळवला आहे. तर 60 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तसेच 3 सामने बरोबरीत सुटले आहेत.
– विंडीजने इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 72 सामने खेळले आहेत. त्यातील 35 सामन्यात विजय, तर 32 सामन्यात पराभव पाहिले आहेत. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आहे. तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
– पाकिस्तानने इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 82 सामने खेळले असून 33 सामन्यात विजय आणि 47 सामन्यात पराभव पाहिला आहे. तसेच 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
– वनडे क्रिकेटमध्ये विंडीजने आत्तापर्यंत 798 सामने खेळले आहेत. यात 392 सामन्यात विजय मिळवला आहे आणि 368 सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच 10 सामने बरोबरीत तर 28 सामने अनिर्णित सुटले आहेत.
– पाकिस्तानने वनडे क्रिकेटमध्ये 917 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 479 सामन्यात विजय आणि 410 सामन्यात पराभव पाहिला आहे. तसेच 8 सामने बरोबरी आणि 20 सामने अनिर्णित सुटले आहेत.
– विश्वचषकात विंडीज आणि पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा विव रिचर्ड्स यांनी केल्या आहेत. त्यांनी 253 धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक विकेट्स कर्टनी वॉल्श यांनी घेतल्या आहेत. त्यांनी 9 विकेट्स घेतल्या आहेत.
– त्याचबरोबर आजपर्यंत विश्वचषकात या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यांत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन शाहिद आफ्रिदीने केले आहे. त्यांने 2011 च्या विश्वचषकात विंडीज विरुद्ध 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बेन स्टोक्सने केली विश्वचषकातील तब्बल २३ वर्षांपूर्वीच्या मोठ्या पराक्रमाची बरोबरी
–…आणि क्विंटन डीकॉक आऊट होता होता वाचला, पहा व्हिडिओ
–इंग्लंडच्या फलंदाजांनी विश्वचषकात पहिल्यांदाच मारला हा खास चौकार






