• About Us
  • Privacy Policy
शनिवार, डिसेंबर 2, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

‘दिल्ली सच में दिल वालों की…’, इंग्लंडविरुद्ध मिळालेल्या पाठिंब्यानंतर राशिदने मानले आभार

'दिल्ली सच में दिल वालों की...', इंग्लंडविरुद्ध मिळालेल्या पाठिंब्यानंतर राशिदने मानले आभार

Atul Waghmare by Atul Waghmare
ऑक्टोबर 16, 2023
in ODI World Cup 2023, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Rashid-Khan

Photo Courtesy: Twitter/cricketworldcup & ACBofficials

अफगाणिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत मोठा उलटफेर केला. रविवारी (दि. 15 ऑक्टोबर) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. हा अफगाणिस्तानचा विश्वचषक इतिहासात 2015नंतरचा दुसरा, तर इंग्लंडविरुद्धचा पहिलाच विजय ठरला. त्यामुळे हा ऐतिहासिक विजय ठरला. या सामन्यानंतर अफगाणिस्तान संघाचा प्रमुख गोलंदाज राशिद खान याने पाठिंब्यासाठी दिल्लीतील चाहत्यांना खास अंदाजात धन्यवाद दिला.

हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 284 धावा केल्या होत्या. यामध्ये रहमानुल्लाह गुरबाजच्या 86 आणि इकराम अलिखिलच्या 58 धावांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणी फिरकीपटूंपुढे गुडघे टेकले. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी मिळून 8 विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंड संघ 40.3 षटकात 215 धावांवर सर्वबाद झाला.

विश्वचषकाचा हा सामना दिल्लीत पार पडूनही येथील चाहत्यांनी अफगाणिस्तान संघाला जबरदस्त पाठिंबा दिला. तसेच, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. तसेच, विजयाचा आनंद असा काही साजरा केला, जसे भारतीय संघानेच इंग्लंडला पराभूत केले आहे.

दिल्लीच्या चाहत्यांचे हे प्रेम पाहून राशिद खान हादेखील फिदा झाला. त्याने एक खास ट्वीट (एक्स) करत लिहिले की, “दिल्ली सच में दिल वालों की है.” म्हणजेच, दिल्ली खरोखर मन असलेल्यांची आहे. त्याने ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “स्टेडिअममध्ये उपस्थित सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि संपूर्ण सामन्यादरम्यान आम्हाला पुढे नेले. जगभरातील आमच्या सर्व समर्थकांनाही त्यांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.”

Delhi sach mein dil walon ki hai 🙌

A huge thank you to all the fans at the stadium who supported us and kept us going through out the game 🙏

And to all our supporters around the 🌍 thank you for your love 💙

— Rashid Khan (@rashidkhan_19) October 16, 2023

राशिदची कमाल
राशिद खान हा 25 वर्षांचा आहे. त्याने फलंदाजी करताना 23 धावांची महत्त्वपूर्ण खेळीही साकारली. दुसरीकडे, गोलंदाजी करताना त्याने 9.3 षटके टाकत फक्त 37 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. अफगाणिस्तान संघासाठी हा विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. तत्पूर्वी त्यांनी 2015मध्ये स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवलेला. (cwc 2023 afghanistan star cricketer rashid khan expresses gratitude to fans for showing huge support to eng vs afg in delhi)

हेही वाचा-
वर्ल्डकप असो किंवा इतर स्पर्धा, बुमराह घेत नाही कसलाच दबाव; स्वत:च केला मोठा खुलासा
श्रीलंकेच्या सलामीवारांचा भन्नाट विक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, वाचाच

Previous Post

कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा

Next Post

अफगाणिस्तानच्या विजयानंतर चाहत्याने मारली सामनावीर ठरेलल्या मुजीबला मिठी, भावूक व्हिडिओ एकदा पाहाच

Next Post
tears in eyes of Mujeeb Ur Rahman's young fan

अफगाणिस्तानच्या विजयानंतर चाहत्याने मारली सामनावीर ठरेलल्या मुजीबला मिठी, भावूक व्हिडिओ एकदा पाहाच

टाॅप बातम्या

  • प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाला भव्य क्रूझवर प्रारंभ
  • चौथ्या टी-20 ऑस्ट्रेलियाला नाही गाठता आले 175 धावांचे आव्हान! भारताने साकारला सूर्यकुमारच्या नेतृत्वात पहिला मालिका विजय
  • आता भारताच्या गोलंदाजांची परीक्षा! रिंकू टिकल्यामुळे संघाची 174 धावांपर्यंत मजल
  • IND vs AUS । सलामीवीर ऋतुराजने घडवला इतिहास, एकाही भारतीयाला न जमलेली कामगिरी करून दाखवली
  • कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम ऑस्ट्रेलियात दाखल, विमानतळावर आली खेळाडूंवर मान खाली घालण्याची वेळ
  • फादर शॉच मेमोरियल आंतरशालेय हॉकी स्पर्धा 2023 । सेंट पॅट्रिक्स, लोयोला, पीसीएमसी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
  • ऑस्ट्रेलियाने जिंकली निर्णायक सामन्याची नाणेफेक! चार महत्वाच्या बदलांसह भारत करणार प्रथम…
  • वर्ल्डकपवर पाय ठेवण्याची कुठलीच खंत नाही! मिचेल मार्श म्हणाला, ‘…पुन्हा करू शकतो’
  • विजय हजारे ट्रॉफीत गोलंदाजांवर जोरात बसरला कार्तिक! ठोकले 13 चौकार आणि 4 जबरदस्त षटकार
  • IPL 2024पूर्वी घोंगावलं RCBच्या पठ्ठ्याचं वादळ! विजय हजारे ट्रॉफीत 81 बॉलमध्ये पाडला ‘एवढ्या’ धावांचा पाऊस
  • ‘इरफानला 5 वर्षे केलं डेट, गंभीरही सारखाच करायचा…’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
  • स्टेडियम प्रशासनाचा ढिसाळ कारभार! निर्णायक सामन्यासाठी लाईटच नाही, थकवलंय कोट्यावधींच वीजबील
  • ‘त्याला लॉलीपॉप दिलंय…’, चहलला टी20 ऐवजी वनडे संघात जागा मिळताच दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
  • कोहली आफ्रिकेविरूद्ध वनडे आणि टी20 खेळत नसल्याने डिव्हिलियर्स नाराज; म्हणाला, ‘त्याने शक्य तितक्या…’
  • दिल्लीने दिला होता डिविलियर्सला धोका? 13 वर्षे जुना किस्सा सांगत ‘मिस्टर 360’ म्हणाला, ‘त्यांनी मला…’
  • दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं विधान; म्हणाला, ‘मी फक्त रिंकूसाठी…’
  • नागराज मंजुळेंनी शड्डू ठोकला! बहुचर्चित ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
  • ‘कुणीही सांगेल, MS Dhoni सर्वोत्तम कॅप्टन, पण रोहित शर्मा…’, अश्विनच्या मुखातून निघाले मोठे विधान
  • ऋतुराजचा शतकी धमाका पाहून भारावला आशिष नेहरा; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहितीये…’
  • साई सुदर्शनची Team India मध्ये एन्ट्री होताच अश्विनला पराकोटीचा आनंद; म्हणाला, ‘या पोराने कुठलीच…’
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In