---Advertisement---

अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांना राशिदकडून मदतीचा हात, विश्वचषकादरम्यान अष्टपैलूने केली मोठी घोषणा

Rashid Khan
---Advertisement---

भारतात सुरू असणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान याने सर्वांची मने जिंकली आङेत. तो फक्त एक चांगला खेळाडून नसून माणूस म्हणून चांगला असल्याचे त्याने दाखवून दिली. विश्वचषक सामन्यांसाठी मिळणारे सामना शुल्क राशिदने अफगाणिस्तानमध्ये भूकंप्रग्रस्त लोकांसाठी दान केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः राशिदने ही माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या पश्चिम प्रांतामध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) अचानक भूकंप आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 2 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. हा आकडा अजूनही वाढत असून 10 हजारांपेक्षा जास्त लोकांना गंभीर दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे. भूकंपग्रस्त रातोरात रस्त्यावर आल्यामुळे यातून सावरण्यासाठी मोठी आर्थिक मदक गरजेची असणार आहे. अशात राशिद खान (Rashid Khan) यानेही मदतीचा हात पुढे केला आहे. विश्वचषख 2023 मध्ये खेळलेल्या सामन्यांसाठी त्याला जी काही सामना शुल्काची रक्कम मिळणार आहे, ती सर्व तो भूकंपग्रस्तांसाठी दान करत आहे.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून राशिदने पोस्ट केली की, “मला अफगाणिस्तानच्या पश्चिम प्रांतांमध्ये (हेरात, फराह आणि बदगीस) आलेल्या भूकंपानंतरचे परिणाम समजल्यानंतर खूप दुःख झाले. मी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी माझे विश्वचषकातील संपूर्ण सामना शुल्क दान करत आहे. आम्ही लवकरच फंड उभा करण्यासाठी एक अभियान देखील सुरू करणार आहोत. याच्या मदतीने आम्ही त्या लोकांना मदत मागणार आहोत, भूकंपग्रस्तांना मदत करू शकतात.” जगभरातील चाहते आणि अफगाणिस्तानची सर्वसामान्य जनता या पुढाकारासाठी राशिदचे कौतुक करत आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानला विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात शनिवारी बांगलादेशविरुद्ध पराभव मिळाला. बांगलादेशने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. विश्वचषकातील आपला दुसरा सामना अफगाणिस्तान बुधवारी यजमान भारतीय संघाविरुद्ध खेळेल. लखनऊमध्ये हा सामना आयोजित केला गेला आहे. (Rashid Khan will donate all of his World Cup 2023 match costs to Afghanistan’s earthquake victims)

महत्वाच्या बातम्या – 
बीसीसीआयची नाचक्की सुरूच! धर्मशालेच्या मैदानाची अवस्था दाखवत बटलरची उघड नाराजी 
स्टोक्सच्या फिटनेसची तक्रार कायम! विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यातून माघार घेण्याची शक्यता, वाचा कधी करणार कमबॅक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---