आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अवघ्या 3 दिवसांवर आली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सर्व संघ आपापल्या तयारींना अंतिम रूप देण्यासाठी सराव सामने खेळत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने ग्लेन मॅक्सवेल याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. चोप्राने मॅक्सवेल याच्या फलंदाजीविषयी म्हटले आहे की, त्याच्या बॅटमधून धावा न निघणे ऑस्ट्रेलिया संघासाठी चिंतेचा विषय आहे.
‘मॅक्सवेलने धावा न करणे…’
युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने म्हटले की, “ग्लेन मॅक्सवेल याने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाला त्याच्या बॅटमधून धावांचीही गरज आहे. हा एक विभाग ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब आहे.”
पुढे बोलताना चोप्रा असे म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. मला वाटते की, स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्नस लॅब्यूशेन, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यात पोहोचवतील. हे संघ उपांत्य सामन्यात पोहोचले, तर हा संघ नॉकआऊट सामन्यात खूपच खतरनाक ठरेल.”
खरं तर, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात पुनरागमन केले होते. या सामन्यात त्याने बॅटमधून खास योगदान दिले नव्हते. मात्र, त्याने आपल्या गोलंदाजीने सामन्यात धमाल केली. त्याने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विकेट्सचाही समावेश होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघ अखेरचा सामना आपल्या नावावर करण्यात यशस्वी झाला होता.
मात्र, ही मालिका भारतीय संघाने 2-1ने आपल्या नावावर केली होती. असे असले, तरीही ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी यजमान भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना दोन्ही संघांमध्ये चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडेल. (cwc 2023 australia need glenn maxwell bat said this former cricketer)
हेही वाचा-
भारताविरुद्धच्या Warm-Up सामन्यापूर्वी ‘स्टेन गन’ने नेदरलँडच्या खेळाडूंना दिल्या टिप्स, व्हिडिओ व्हायरल
CWC23: भारतीय संघाचे तिरुवनंतपुरम येथे पारंपरिक अंदाजात स्वागत, दुसऱ्या सराव सामन्यात नेदरलँडशी भिडणार