आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेने अर्धा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत स्पर्धेची रंगत प्रचंड वाढली आहे. भारतीय प्रेक्षकांमधील उत्साह पाहण्यासारखा आहे. अशात 5 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा 37वा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात भारताने 243 धावांनी विजय मिळवला. रोहित शर्मा याच्या सेनेच्या विजयानंतर 140 कोटी भारतीयांनी जल्लोष केला. अशात एक व्हिडिओ समोर येत आहे, जो उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील आहे. यामध्ये नवरा-नवरीने भारताच्या विजयानंतर अनोख्या पद्धतीने लग्न केले.
विशेष म्हणजे, या जोडप्याने भारतीय (Team India) संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या विजयाचे आणि विराट कोहली (Virat Kohli) याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या विक्रमाची बरोबरी केल्यामुळे हा जल्लोष केला आहे. मुरादाबाद येथे एक लग्नसोहळा पार पडला. यावेळी नवरदेव आणि नवरीसह लग्नात सामील झालेल्या नातेवाईकांनी विराटचा फोटो घेऊन पोझ दिल्या.
यावेळी नवरदेव म्हणाला की, “हा माझ्यासाठी ‘डबल धमाका’ आहे. कारण, आज माझे लग्नही आहे आणि भारतानेही आज शानदार विजय मिळवला आहे. तसेच, विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.” याव्यतिरिक्त नवरी म्हणाली की, “हे आश्चर्यजनक वाटते. आम्ही हा दिवस सदैव आठवणीत ठेवू.”
#WATCH | Uttar Pradesh: A bride and groom, along with their relatives and friends, celebrate the victory of Team India against South Africa, in Moradabad
"It is a 'double dhamaka' for me as today is my wedding and India has also won today and Virat Kohli has equalled Sachin… pic.twitter.com/andXVGrEko
— ANI (@ANI) November 5, 2023
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारताने आपल्या 8व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी पराभूत केले. सामन्याचा नायक विराट कोहली ठरला. त्याने 35व्या वाढदिवशी 49वे वनडे शतक साजरे केले. या शतकासह विराटने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा याने एकूण 5 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांच्या खात्यात 2, तर मोहम्मद सिराजने 1 विकेट नावावर केली.
भारत अव्वलस्थानी
भारत सलग 8व्या विजयानंतर आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी विराजमान आहे. भारताने एकूण 8 सामने खेळले असून त्यातील सर्व सामने जिंकले आहेत. यासह भारताचे 16 गुण झाले आहेत. (CWC 2023 bride and groom celebrated indias victory against south africa and got married see video)
हेही वाचा-
‘भारत विरुद्ध आख्खं जग…’, दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचल्यानंतर पाकिस्तानातून आली मोठी प्रतिक्रिया
‘तर रोहित शर्माने 20 सिक्स मारले असते’, दक्षिण आफ्रिकेला डिवचत शोएब अख्तरचे मोठे विधान