सव्वा लाख प्रेक्षकांनी नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला हजेरी लावली आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेतील हा 12वा सामना आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी सलामी फलंदाज अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. यानंतर मोहम्मद सिराज याने अब्दुल्ला शफीक याला वैयक्तिक 20 धावांवर तंबूच्या दिशेने चालतं केलं.
इमाम उल हक याने बाबर आझम (Babar Azam) याच्यासोबत धावफलक हलता ठेवला. इमाम क्रीझवर टिच्चून फलंदाजी करत होता, तर भारताला विकेटची आवश्यकता होती. यावेळी भारताकडून 13वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आला. त्याने इमामच्या रूपात भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. मात्र, चेंडू टाकण्यापूर्वी पंड्याने एका खास मंत्राचा वापर केल्याचे बोलले जात आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानच्या डावातील 13व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इमामने चौकार मारला होता. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याच्यासोबत चर्चा केली. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी चेंडू दोन्ही हातांनी पकडून पंड्या आपले डोळे बंद करत काहीतरी बोलला. त्यानंतर या चेंडूवर त्याने इमामला केएल राहुल (KL Rahul) याच्या हातून झेलबाद केले.
Hardik Pandya ❤️❤️ pic.twitter.com/IRZsYe9Y8g
— Meet Shah (@MeetshahV) October 14, 2023
अवघ्या 33 षटकात अर्धा संघ तंबूत
पुढे 33 षटकांचा खेळ झाल्यानंतर पाकिस्तान संघाने दीडशे धावांचा टप्पा पार केला होता. मात्र, त्यांचा यावेळी अर्धा संघ तंबूत परतला. पाकिस्ताने 33 षटकापर्यंत 5 विकेट्स गमावत 166 धावा केल्या. 33वे षटक टाकत असलेल्या कुलदीप यादव याने दोन विकेट्स मिळवून दिले.
Mantra from Hardik Pandya to the ball.
Next ball, Imam Ul Haq was dismissed. pic.twitter.com/n49dGtDOx9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
विश्वचषकातील 12व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ (cwc 2023 cricketer hardik pandya recited special mantra throwing ball got wicket imam ul haq see video)
हेही वाचा-
पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम, मागील 7 सामन्यात ठरलेले अपयशी
रोहितचा पाकिस्तानविरुद्ध अनोखा विक्रम! विश्वचषकात बदलून टाकला भारताचा इतिहास, काय केलंय वाचाच