भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आपल्या आठव्या सामन्यात आमने-सामने आहेत. हा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्यात भारताला शंभर धावांच्या आतच दोन धक्के बसले. त्यात रोहित आणि युवा सलामीवीर शुबमन गिल यांचा समावेश आहे. शुबमन ज्या पद्धतीने बाद झाला, आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महाराजच्या जबरदस्त चेंडूवर शुबमनची विकेट
या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात जबरदस्त झाली. मात्र, भारताला एक विकेट पॉवरप्लेमध्ये, तर दुसरी विकेट 11व्या षटकात गमवावी लागली. रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. तो 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीला आला. त्याने शुबमन गिल (Shubman Gill) याची साथ दिली. मात्र, गिल फार काळ मैदानावर टिकू शकला नाही.
झाले असे की, दक्षिण आफ्रिकेकडून 11वे षटक टाकण्याची जबाबदारी केशव महाराज याने घेतली. त्याने षटकातील तिसरा चेंडू असा टाकला, जो स्ट्राईकवर असलेल्या गिललाही समजला नाही. महाराजच्या या चेंडूने गिलच्या बॅटला चकवत स्टम्प्सचा वेध घेतला. त्यामुळे गिल स्वस्तात बाद झाला. त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. गिल या सामन्यात 24 चेंडू खेळून फक्त 23 धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Ball of the Century !!#INDvsSAhttps://t.co/keDPSlQOqZ
— Gaurav (@viratian_83) November 5, 2023
शुबमन गिलची स्पर्धेतील कामगिरी
शुबमन गिलने या विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यात त्याने 36.50च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत. 92 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकेही निघाली आहेत. (cwc 2023 Keshav Maharaj takes Shubman Gill Wicket See video)
हेही वाचा-
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट
कोलकात्यात टॉस जिंकून रोहितचा दक्षिण आफ्रिकेला धक्का! बावुमासेनेत मोठा बदल, पाहा Playing XI