दक्षिण आफ्रिका संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 20व्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंड संघाला तब्बल 229 धावांनी पराभवाची धूळ चारली. इंग्लंड संघाचा चालू विश्वचषकातील प्रवास खूपच कठीण होत चालला आहे. या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज आणि गोलंदाजही संघाचा पराभव रोखू शकले नाहीत. अशात या मोठ्या आणि लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडला विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबल यादीतही नुकसान सोसावे लागले.
पराभवामुळे इंग्लंडचे मोठे नुकसान
झाले असे की, दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने या सामन्यात इंग्लंड (England) संघाचा 229 धावांनी पराभव करताच जोस बटलर (Jos Buttler) याची सेना सहाव्या स्थानावरून थेट 9व्या स्थानी घसरली आहे. म्हणजेच इंग्लंड संघाच्या खाली आता फक्त अफगाणिस्तान आहे. बांगलादेश आणि नेदरलँड्स यांसारखे संघही विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबल (World Cup 2023 Points Table) यादीत इंग्लंडच्या पुढे गेले आहेत. इंग्लंडने आतापर्यंत स्पर्धेत खेळलेल्या चार सामन्यांपैकी फक्त एकमध्ये विजय मिळवला आहे. इतर तिन्ही सामन्यात गतविजेत्या संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यामध्ये अफगाणिस्तानने केलेल्या पराभवाचाही समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेला फायदा
मागील सामन्यात नेदरलँड्सकडून पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाने स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले. इंग्लंडला 229 धावांनी पराभूत केल्यामुळे संघाला चांगलाच फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट खूपच चांगला झाला आहे. ते 6 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत.
Point table status after 4 matches of each team. South Africa is on top after winning four matches out of 4. India placed second with equal wins. No.BAN at number 6. The chance of Semifinal for BAN is still alive by SA win yesterday.
Which 4 team will qualify for Semi?#CWC2023 pic.twitter.com/6htGofdBBt— ER Saif 🇧🇩 (@ERSaif14) October 22, 2023
अव्ववस्थानी न्यूझीलंड
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी न्यूझीलंड संघ विराजमान आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट (+1.923) चांगला असल्यामुळे ते अव्वलस्थानी आहेत. न्यूझीलंडने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामने जिंकले आहेत. तसेच, दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ आहे. भारताचा नेट रनरेट +1.659 आहे. अशात रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ एकमेकांशी भिडणार आहेत. अशात भारताकडे हा सामना जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये अव्ववस्थान पटकावण्याची सुवर्णसंधी असेल. (cwc 2023 latest points table after eng vs sa match south africa beat england by 229 runs)
हेही वाचा-
लाजीरवाण्या पराभवानंतर बटलरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘लय घाण हरवलं, कडक उन्हामुळे…’
“मला नाही वाटत मी योग्य…” सामनावीर पुरस्कार मिळाल्यावर नाखुश दिसला क्लासेन