---Advertisement---

टोप्ली पुढे बांगलादेशची टॉप ऑर्डर गुडघ्यावर! तीनच षटकात केली वाताहात

---Advertisement---

मंगळवारी (10 ऑक्टोबर) वनडे विश्वचषकात इंग्लंड व बांगलादेश संघ समोरासमोर आले. या सामन्यात इंग्लंड प्रथम फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंड संघासाठी सलामीवीर डेव्हिड मलान याने शानदार झळकावले. यासोबतच जॉनी बेअरस्टो व जो रूट यांनी देखील अर्धशतके ठोकल्याने इंग्लंडने 364 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाची इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिसे टोप्लीने अक्षरशा वाताहात केली.

फलंदाजांनी उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा बचाव करताना इंग्लंडसाठी दुसरे षटक रिसे टोप्लीने टाकले. चौथ्या चेंडूवर त्याने तन्झीम इस्लाम तर पाचव्या चेंडूवर नजमुल हसन शांतो याला बाद करत बांगलादेशला जबर धक्के दिले. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या षटकात केवळ पाच धावा निघाल्या. तर तिसरे षटक निर्धाव टाकताना त्याने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याचा त्रिफळा उडवला.

(CWC 2023 Reece Topley Took Three Wickets In 3 Overs Against Bangaladesh)

हेही वाचा-
रूटने घडवला इतिहास, विश्वचषकात ‘असा’ विक्रम करत बनला इंग्लंडचा पहिलाच फलंदाज; वाचाच
बांगलादेशविरुद्ध मलानची तोडफोड फलंदाजी! ठोकले विश्वचषकातील आपले पहिले-वहिले शतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---