---Advertisement---

बांगलादेशविरुद्ध मलानची तोडफोड फलंदाजी! ठोकले विश्वचषकातील आपले पहिले-वहिले शतक

David-Malan
---Advertisement---

इंग्लंडचे फलंदाज विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातव्या सामन्यात कहर फलंदाजी करत आहेत. मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामेन आहेत. या सामन्यात इंग्लंड प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. इंग्लंडकडून आधी सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ सलामीवीर डेविड मलान यानेही वादळी फलंदाजी करत शतक पूर्ण केले आहे.

डेविड मलानचे शतक
डेविड मलान (Dawid Malan) याने या सामन्यात 91 चेंडूंचा सामना करताना 100 धावांची शतकी खेळी केली. मलानने शतक करताना 2 षटकार आणि 12 चौकारांचाही पाऊस पाडला. हे त्याचे वनडे विश्वचषकातील पहिले आणि वनडे कारकीर्दीतील एकूण 6वे शतक होते. तसेच, यावर्षीचे हे चौथे शतक ठरले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंड संघाने सहजरीत्या 200 धावांचाही आकडा पार केला.

विश्वचषकातील पहिल्या सामन्यात निराश
बांगलादेशविरुद्ध शतक झळकावणाऱ्या मलानने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात सर्वांनाच निराश केले होते. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने होते. हा सामना न्यूझीलंडने 82 चेंडू आणि 9 विकेट्स राखून जिंकला होता. या सामन्यातील मलानच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 24 चेंडू खेळले होते. मात्र, त्याला फक्त 14 धावा करून तंबूचा रस्ता पकडावा लागला होता. त्याच्या या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या सामन्यात इंग्लंडकडून जो रूट चमकला होता. त्याने एकट्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. रूटने 86 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक 77 धावांचा पाऊस पाडला होता. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.

डेविड मलानची कारकीर्द
मलानने त्याच्या वनडे कारकीर्दीत इंग्लंडकडून या सामन्यापूर्वी 22 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 1060 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली होती. (Dawid Malan score first hundred in the ODI World Cup 2023)

हेही वाचा-
आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांनंतर होणार क्रिकेटचे पुनरागमन, ‘या’ खेळांचाही समावेश
राहुलचं विधान तुमच्याही काळजाला भिडेल! भारताच्या विजयानंतर म्हणाला, ‘लोक माझ्यावर…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---