---Advertisement---

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ‘गंजते’ कोहलीची बॅट, 2011पासून करतोय ‘विराट’ संकटाचा सामना; आकडे भीतीदायक

Virat-Kohli-SEMI
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली याचाही समावेश आहे.  विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. विराटच्या बॅटमधून आतापर्यंत 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा पाऊस पडला आहे. अशात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यातूनही चाहत्यांना विराटकडून भरपूर अपेक्षा आहेत. मात्र, वनडे विश्वचषकाचा उपांत्य सामना विराटसाठी बॅटमधून कधीही खास ठरला नाही. कसं ते चला जाणून घेऊयात…

उपांत्य फेरीत विराटची बॅट शांतच
विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत आतापर्यंत एकूण 3 वनडे विश्वचषक स्पर्धेचे उपांत्य सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात मिळून त्याने 11 धावा केल्या आहेत. 2011 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात विराटच्या बॅटमधून फक्त 9 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर 2015च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट फक्त 1 धाव करून तंबूत परतला होता. तसेच, 2019च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना विराटच्या खात्यात फक्त 1 धाव पडली होती.

कोहलीची ‘विराट’ कमजोरी
विश्वचषक स्पर्धेच्या तिन्ही उपांत्य सामन्यात विराटची विकेट डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने घेतली आहे. 2011मध्ये विराटला वहाब रियाजने तंबूत पाठवले होते. 2015मध्ये विराट मिचेल जॉनसन याच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. तसेच, 2019च्या विश्वचषकात ट्रेंट बोल्टने भारतीय माजी कर्णधाराला तंबूत पाठवले होते. म्हणजेच, डावखुरे वेगवान गोलंदाज ही विराटची उपांत्य सामन्यांमधील सर्वात मोठी कमजोरी आहे.

विराट जबरदस्त फॉर्ममध्ये
असे असले, तरीही विराट कोहली विश्वचषक 2023 (Virat Kohli World Cup 2023) स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात त्याने 99च्या सरासरीने आणि 88च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 594 धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर या विश्वचषकात 2 शतके आणि 5 अर्धशतकांची नोंद आहे. भारताच्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना हीच आशा असेल की, हाच फॉर्म विराट उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध कायम ठेवण्यात यशस्वी होईल. (CWC 23 ind vs nz virat kohli have poor record in odi world cup semifinal )

हेही वाचा-
आयपीएल 2024मध्ये खेळण्याविषयी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी आयपीएलच्या लिलावात…’
ब्रेकिंग! वर्ल्डकप 2023 सेमीफायनल अन् फायनलसाठीच्या राखीव दिवसाबाबत मोठी अपडेट, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---