लंडन। आज(9 जून) 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 352 धावांचा डोंगर उभा केला आहे आणि ऑस्ट्रेलियाला 353 धावांचे आव्हान दिले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. यावेळी पहिल्या षटकात भारताकडून भुवनेश्वर कुमारने केवळ 3 धावा दिल्या होत्या. तर जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असलेल्या दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर वॉर्नर बाद होता होता थोडक्यात वाचला.
झाले असे की बुमराहने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट लेन्थचा टाकला. यावर फलंदाजी करत असलेल्या वॉर्नरने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू त्याच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागून लेग स्टंम्पला लागला. मात्र स्टंम्पला चेंडू लागूनही बेल्स पडल्या नाहीत.
त्यामुळे वॉर्नरला जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे वॉर्नरनेही या जीवदानाचा फायदा घेत अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 84 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्याला नंतर युजवेंद्र चहलने बाद केले.
चेंडू स्टंम्पला लागल्यानंतरही बेल्स न पडण्याच्या घटना या विश्वचषकात याआधीही घडल्या आहेत. तसेच अशाच प्रकारच्या घटना यावर्षीच्या आयपीएल दरम्यानही पहायला मिळाल्या होत्या. त्यावेळीही याबद्दल बरीच चर्चा झाली होती.
आजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शतकी खेळी केली आहे. त्याने 109 चेंडूत 117 धावा केल्या. यात त्याने 16 चौकार मारले. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अनुक्रम 82 आणि 57 धावांंची अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने 2 विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप ५: शिखर धवनने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम
–फ्रेंच ओपन २०१९: ऍश्ले बार्टीला विजेतेपद; ऑस्ट्रेलियाची ४६ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात
–विश्वचषक २०१९: हिटमॅन रोहित शर्माने मास्टर ब्लास्टरला मागे टाकत रचला नवा विश्वविक्रम






