---Advertisement---

‘विराटचा कॅच सुटल्यानंतर मी…’, भारताच्या विजयानंतर अश्विनचे खळबळजनक विधान; वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

On: सोमवार, ऑक्टोबर 9, 2023 12:03 PM
Ravichandran-Ashwin
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने 140 कोटी क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षेनुसार अभिनायानाची सुरुवात केली. रविवारी (दि. 08 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने फडशा पाडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. यादरम्यान एकेवेळी भारतीय संघ 3 बाद 2 धावांवर होता. इथून पुढे विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दीडशतकी भागीदारीने सामन्याची दिशा बदलून टाकली. तसेच, सामन्यानंतर रविचंद्रन अश्विन यानेही आपल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. तो म्हणाला की, विराट कोहलीचा झेल सुटला, त्यानंतर त्याला संपूर्ण सामना एका जागी उभे राहून पाहावा लागला.

काय म्हणाला अश्विन?
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर मोठे विधान केले. तो म्हणाला, “जेव्हा मी विराट कोहलीचा झेल हवेत जाताना पाहिला, तेव्हा ड्रेसिंग रूममधून धावत बाहेर आलो होतो. मला त्यावेळी काय करायचे माहिती नव्हते. मला वाटत होते की, जेव्हा सर्व संपेल, तेव्हा कोणीतरी मला उठवा. पाहा मला वाटते की, मोठ्या सामन्यात आम्हाला अशा स्थितीचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळता, तेव्हा तो कधीही छोटा सामना नसतो.”

पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला 199 धावसंख्येवर बाद केल्यानंतर असा विचार करता की, तुम्ही सामन्यात खूप पुढे आहात, तेव्हा विराट कोहली अशाप्रकारेही बाद होऊ शकला असता. जेव्हा मी विराट कोहलीचा झेल सुटला, त्यानंतर पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये गेलो, तेव्हा प्रेक्षकांनी खूपच आरडाओरडा केला. यानंतर मी संपूर्ण डाव एकाच जागी उभे राहून पाहिला आणि माझा पाय आता खूपच दुखत आहे.”

खरं तर, विराटला जीवनदान मिळाल्यानंतर त्याने टिच्चून फलंदाजी केली. त्याने या सामन्यात 116 चेंडूंचा सामना करताना 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. त्याच्या या अफलातून खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला.

भारताच्या फिरकीपटूंची जादू आली कामी
ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखण्यात भारताच्या प्रमुख 3 फिरकीपटूंनी सिंहाचा वाटा उचलला. भारत या सामन्यात 3 फिरकीपटूंसोबत उतरला होता. त्यांचा हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला. रवींद्र जडेजा याने भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 आणि अश्विनने 1 विकेट घेतली.

अशात भारतीय संघाचा पुढील सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cwc23 ind vs aus ravichandran ashwin said i stayed in the same place watching for the entire game after virat kohli catch drop)

हेही वाचा-
‘मी घाबरलो होतो…’, विश्वचषकातील पहिला सामना जिंकल्यानंतर रोहितचे धक्कादायक विधान, असं का म्हणाला?
विजयामुळे न्यूझीलंड कॉन्फिडेन्ट, तर पराभवाचं तोंड पाहिलेला नेदरलँड; NZ vs NED सामन्यात कोणाचं पारडं जड? वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---