---Advertisement---

वर्ल्डकप कमबॅकमध्ये अश्विन आण्णाचा जलवा! होम ग्राउंडवर केली कमाल

On: रविवार, ऑक्टोबर 8, 2023 5:41 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली आहे. चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या जेरीस आणले. फलंदाजांना धावा कुटताना संघर्ष करावा लागत आहे. अशात भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने आपल्या विश्वचषकातील पुनरागमनात दमदार कामगिरी करून दाखवली.

https://twitter.com/BCCI/status/1710981087911174609?t=our9pehgPPCx7MZfXVC_VQ&s=19

या विश्वचषकासाठी घोषित झालेल्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विन याचा समावेश नव्हता. मात्र अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने अश्विन याचा संघात समावेश केला गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला थेट अंतिम अकरामध्ये सामील केले गेले. आपल्या होम ग्राउंडवर खेळत असलेल्या अश्विन याने भारतीय संघाला व प्रेक्षकांना अजिबात निराश न करता सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली.

भारतीय संघासाठी पहिला बदल म्हणून तो गोलंदाजीला आला. त्याने अनुभवी स्मिथ व वॉर्नर यांना चांगलेच अडचणीत टाकले. त्याच्या दबावामुळे कुलदीप यादव याने ही जोडी फोडली. अश्विन याने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये देखील शानदार गोलंदाजीचा नजारा पेश केला. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीला आल्यावर त्याने मोठी खेळी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कॅमेरून ग्रीन याला हार्दिक पंड्याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 34 धावा देत एक बळी मिळवला. सोबतच एक निर्धाव षटकही टाकले.

अश्विन 2015 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर प्रथमच विश्वचषकात खेळत आहे. 2019 विश्वचषकाय त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र, यावेळी संधी मिळाल्यानंतर त्याने सोने करत आपल्या घरच्या मैदानावर भारतीय संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

(Ravichandran Ashwin Makes Comeback In ODI World Cup With Finest At Chepauk)

महत्वाच्या बातम्या – 
आजपर्यंत जो विक्रम सचिन-डिविलियर्सच्या नावावर होता, तो वॉर्नरने टाकला मोडून; बनला यादीतील टॉपर 
IND vs AUSच्या वर्ल्डकप अभियानाला सुरुवात! टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, पाहा तगडी प्लेइंग XI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---