शनिवारी (दि. 28 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 27वा सामना धरमशाला येथे पार पडला. या थरारक सामन्यात अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय झाला. हा ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील सलग चौथा विजय होता. विशेष म्हणजे, स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त लय पकडली. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 6 सामन्यांपैकी 4 विजय आणि 2 पराभव पत्करले. चौथ्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची बरोबरी केली. आता दोन्ही संघांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. मात्र, पराभवानंतरही न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलियाच्या वर आहे. यामागील कारण जाणून घेऊयात…
न्यूझीलंड संघाने 6 सामने खेळले असून त्यापैकी हा सलग दुसरा पराभव आहे. मात्र, विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) न्यूझीलंडच्या स्थानात कोणताही बदल झाला नाहीये. न्यूझीलंड 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी कायम आहे. खरं तर, न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.232 इतक आहे, तर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट +0.970 इतका आहे. नेट रनरेटच्या आधारे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला तिसऱ्या जागेवरून बाजूला करू शकला नाही.
भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम
पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाचे एकसमान म्हणजेच प्रत्येकी 10 गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या आधारे दक्षिण आफ्रिका अव्वलस्थानी, तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. 10 गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +2.032 आहे, तर 10 गुणांसह भारताचा नेट रनरेट +1.353 आहे.
नेदरलँड्सलाही फायदा
याव्यतिरिक्त स्पर्धेचा 28वा सामना नेदरलँड्स विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. यात नेदरलँड्सने 87 धावांनी विजय मिळवला. त्यांना त्याचा पॉईंट्स टेबलमध्ये फायदा झाला. नेदरलँड्स पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी पोहोचला. तसेच, इंग्लंड पुन्हा दहाव्या स्थानी पोहोचला.
https://twitter.com/OfclMaula/status/1718477464639295991
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 771 धावांचा पाऊस
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (AUS vs NZ) सामन्यात वनडे क्रिकेटमधील मोठा विक्रम रचला गेला. ही कोणत्याही वनडे सामन्यातील चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी 2006मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात 872 धावांचा पाऊस पडला होता. तसेच, 2009मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात 825 धावा बनल्या गेल्या होत्या. या धावा राजकोटमध्ये बनल्या होत्या. तसेच, 2019मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड सामन्यात 807 धावांचा पाऊस पडला होता. यापूर्वी विश्वचषकाच्या एका सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 754 धावांचा विक्रम बनला होता, जो वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्यात बनला होता. (cwc23 points table australias fourth consecutive win same points then why are the aus behind new zealand know here)
हेही वाचा-
CWC23 : सलग चौथा सामना जिंकल्यानंतर काय होत्या कमिन्सच्या भावना? म्हणाला, ‘विरोधी संघाने आम्हाला…’
‘वर्ल्डकप तर आम्हीच…’, ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी हारल्यानंतर हुंकरला टॉम लॅथम; खेळाडूंचेही गायले गोडवे