भारताचा युवा वेटलिफ्टर अजिंत शुली याने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या २०२२ हंगामात ३१ जुलै रोजी इतिहास रचला. अचिंतचे वय सध्या २० वर्ष असून त्याने पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात भारातसाठी वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या चालू हंगामात भारतासाठी हे तिसरे सुवर्णपदक आहे आणि विशेष म्हणजे हे तिन्ही सुवर्ण पदके भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग प्रकारामध्ये मिळवली आहेत.
मागच्या वर्षी जागतिक जूनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत शुलीने रौप्य पदक जिंकले होते. मुळचा पश्चिम बंगालचा असणारा अंचित शुली (Achinta Sheuli) याने स्नॅचमध्ये १४३ किलोग्राम वजन उचलले, जो कॉमनवेल्थ गेम्समधील विक्रम ठरला आहे. तसेच क्लीन एंड जर्कमध्ये १७० किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण ३१३ किलो वजन उचलून कॉमवेस्थ गेम्साचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ही जबरदस्त कामगिरी केली आहे. मलेशियाचा ई हिदायस मोहम्मद याने रौप्य पदक पटकावले, तर कनाडाचा शाद डारसिग्नी याने कांस्य पदक पटकावले. या दोघांनी अनुक्रमे ३०३ आणि २९८ किलोग्राम वजन उचलले.
कॉमनवेल्थ गेम्सच्या चालू हंगामतील भारताचे हे एकूण सहावे पदक आहे. भारताने जिंकलेले हे सर्वच्या सर्व ६ पदक हे वेटलिफ्टिंग प्रकारातील आहेत आणि याच कारणास्तव सर्वांना त्याचे नवल वाटत आहे. भारताने आतापर्यंत एकूण तीन सुवर्ण पदक, दोन रौप्य पदक आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. अजिंक्य सुलीच्या आधी ३० जुलै रोजी संकेत महादेव सरगर याने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर गुरुराज पुजारीने ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक जिकंले.
तसेच ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने या स्पर्धेत ४९ किलो वजनी गडात सुर्वर्ण पदक जिंकले. बिंदियारानी देवीने भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये चौथे पदक मिळवून दिले. तिने ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर ६७ किलो वजनी गटात जेरेमी लालरिनुगाने सुवर्ण पदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आजपर्यंत १३१ पदके जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया एकमेव असा देश आहे, ज्याने भारतापेक्षा जास्त पदके नावावर केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नाद नाद नादच! कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची ‘सिक्सर क्विन’ बनली हरमनप्रीत, व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळणाऱ्या सर्व भारतीयांसाठी विराटचे खास ट्वीट, ‘अशा’ शब्दात दिल्या शुभेच्छा
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी लीग खेळण्यावर आली मोठी अपडेट; वाचा सविस्तर