सध्या बर्मिंघममध्ये खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतीय खेळाडूही स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चाहतेही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवताना दिसत आहेत. परंतु स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी एक भयानक दुर्घटना घडली. हा प्रसंग पुरुषांच्या १५ किमी सायकलिंग स्पर्धेदरम्यान घडला.
माध्यमांतील वृत्तानुसार सायकलस्वार मॅट वॉल्स आणि कनाडचा डेरेक जी यांनी नियंत्रण गमावल्यामुळे ते ट्रॅकच्या बाहेर जात प्रेशक्षांमध्ये घुसले. या दुर्घटनेनंतर त्याठिकाणी चांगलाच गोंधळ झाला आणि इतर प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सायकलस्वार मॅथ्यू बोस्टॉक देखील या दुर्घटनेचा भाग होता. वॉल्स, डेरेक जी आणि बोस्टॉक या तिघांना झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात घलवावे लागले.
या भीषण दुर्घटनेनंतर प्रक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली होती आणि प्रत्येकजण हैराण होता. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “ली वॅली वेलोपार्कमध्ये ट्रॅक आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग स्पर्धेच्या सुकाळच्या सत्रात एक दुर्घटना घडली. त्यानंतकर मेडिकल टीमद्वारे मैदानात सायकस्वार आणि प्रेक्षकांवर उपचार केले गेले. मात्र, तीन सायकलस्वारांना रुग्णालयात घलवावे लागले.”
https://twitter.com/Sky5Sports/status/1553731043466805248?s=20&t=eKszWUC6GuEeG1CTceZ94A
दरम्यान, सायकस्वार प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे प्रामुख्याने दोघांना दुखापत झाली होती. परंतु त्यांना रुग्णालयात घेऊन जावे लागले नाही. “दोन्ही प्रेक्षकांना रुग्णालयातील उपचाराची गरज नव्हती. आम्ही या दुर्घटनेचा भाग असलेल्या सर्व सायकलस्वारांना आणि प्रेक्षकांच्या आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करू इच्छितो. तसेच तत्काळ मदतीसाठी आलेल्या मेडिकल टीमला देखील धन्यवाद म्हणू इच्छितो,” असे अधिकारी पुढे बोलताना म्हणाला.
ब्रिटनमधील सायकलिंगच्या प्रशिसकिय समितीने देखील या दुर्घटनेनंतर ट्वीट केले आहे. ट्वीटमधून माहिती दिली गेले की, “मॅट शुद्धीत आला आणि बोलतही आहे. रुग्णालयातील मेडिकल टीम त्याच्यावर नजर ठेवून आहे.” दरम्यान, या ट्वीटनंतर मॅट वॉल्सला रुग्णालयातून सोडले गेले. दुसरीकेडे टीम इंग्लंडने धावा केला की, ऑलिम्पिक चॅम्पियन मॅटला त्याच्या डोक्यात दुखापत झाली आहे आणि दुखापतीच्या जखमा दिसत आहे. त्याला काही टाके लावले गेले आहेत, असेही सांगितले गेले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतने चालवली टीम इंडियाची परंपरा, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर केले ‘हे’ हृद्य जिंकणारे कृत्य
क्रिकेटमधील दुषित वातावरणाचे कारण देत विंडीजच्या आणखी एका दिग्गजाने जाहिर केली निवृत्ती!
पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट