बर्मिंघम| पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार प्रदर्शन करत अंतिम सामन्यात (Commonwealth Games 2022 Final) धडक मारली आहे. शनिवारी (०६ ऑगस्ट) ऍजबस्टन मैदानावर पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला ४ धावांनी पराभूत करत भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात पोहोतच भारतीय संघाने रौप्य पदक निश्चित केले आहे. जर त्यांना अंतिम सामना जिंकण्यात यश आले, तर सुवर्ण पदक त्यांच्या झोळीत पडेल. तत्पूर्वी कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या अंतिम सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घेऊया…
कसा राहिला भारताचा कॉमनवेल्थमधील अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
भारतीय संघाने कॉमनवेल्थ गेम्सच्या साखळी फेरीतील ३ पैकी २ सामने जिंकले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना ३ विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दमदार पुनरागमन करत भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला ८ विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर भारतीय संघाने बार्बाडोसला १०० धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली होती.
उपांत्य सामन्यात भारताचा आमना सामना इंग्लंडशी झाला. उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतीय संघाने शेवटच्या षटकात ४ धावा राखून सामना जिंकला. यासह भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
केव्हा खेळला जाईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना?
रविवारी, दिनांक ७ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australai) संघातील अंतिम सामना होईल
कुठे होईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना?
बर्मिंघमच्या ऍजबस्टन स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना होईल
किती वाजता होईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होईल
टीव्हीवर कुठे लाईव्ह पाहता येईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना टीव्हीवर सोनी नेटवर्कच्या चॅनलवर लाईव्ह पाहता येईल
ऑनलाईन कुठे लाईव्ह पाहता येईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह ऍपवर पाहता येईल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अजून किती छळशील..! आधीच त्रासलेल्या वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा भर मैदानात पंतने मांडला छळ
पुन्हा एकदा चक दे! भारतीय हॉकी संघही फायनलमध्ये; गोल्ड मेडलसाठी ठोकणार दावेदारी
‘हिटमॅन’ बनला सोळा हजारी मनसबदार! दिग्गजांच्या यादीत वादळी खेळीसह पदार्पण