रविवार (३१ जुलै) भारताच्या क्रिकेट संघांसाठी आणि चाहत्यांसाठी महत्वाचा दिवस आहे. बर्मिंघम, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. आता भारत दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. संघाचा दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध होईल.
एजबस्टन येथे खेळला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सामने गमावले असून दोघांसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. पाकिस्तान बार्बाडोसविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता. भारतासाठी आनंदाची बातमी अशी की, या सामन्यात पूजा वस्त्राकर आणि एस मेघना संघात परतण्याची शक्यता आहे. पदकाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला काही बदल आणि परिपूर्ण रणनीतीने मैदानात उतरावे लागणार आहे.
सलामी जोडी-
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची सलामीची जोडी चांगली सुरूवात करून देऊ शकली नाही. या सामन्यात स्म्रीती मंधानाने तिची विकेट लवकरच गमावली. यामुळे तिला पाकिस्तान विरुद्दच्या खेळपट्टीवर टिकून राहावे लागणार आहे.
मधली फळी चिंतेची बाब-
कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीने पहिल्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. तिने ५२ धावा केल्या, मात्र दुसऱ्या बाजूने तिला हवी तशी साथ मिळाली नाही. यामुळे भारताच्या धावसंख्येत काही धावा कमी पडल्या. यासाठी जर विरोधी संघापुढे मोठे लक्ष्य ठेवायचे असेल तर जेमिमाह रॉड्रिगेज, यस्तिका भाटीया, दीप्ती शर्मा आणि हरलीन देओल यांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.
गोलंदाजीत दोन्ही बाजूंनी आक्रमण आवश्यक-
ऑस्ट्रेलिया विरोधात रेणुका सिंगने जबरदस्त गोलंदाजी करत पहिला ४ विकेट्स काढल्या. तिने ४ षटकात १८ धावा देत ही कामगिरी केली. मात्र बाकी गोलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. या चुकांची पुनरावृत्ती पाकिस्तान विरुद्ध टाळावी लागणार आहे. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. विरोधी संघाला दबावात ठेवायचे असेल तर गोलंदाजी दोन्ही बाजूंनी आक्रमण होणे गरजेचे आहे.
अंतिम अकरासाठी भारताचा संघ खालील खेळाडूंमधून निवडला जाईल-
स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिगेज, दीप्ती शर्मा, हरलीन देओल, राधा यादव, मेघना सिंग,रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, सबभिनेनी मेघना, तानिया भाटिया
अंतिम अकरासाठी पाकिस्तानचा संघ खालील खेळाडूंमधून निवडला जाईल-
इरम जावेद, मुनीबा अली (यष्टीरक्षक),ओमैमा सोहेल, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दार, आलिया रियाज, आयशा नसीम, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन, एमान अन्वर, कायनात इम्तियाज, सादिया इकबाल, गुल फिरोजा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ये दिल मांगे मोअर!’ भारतीय फलंदाजांनी ठोकल्या १९० धावा तरीही रोहितचे मन भरेना, वाचा काय म्हणाला
विंडीजनंतर झिम्बाब्वे दौऱ्यातूनही विराट आऊट, आता थेट ‘तेव्हाच’ करणार पुनरागमन?
भारत पाकिस्तान एजबॅस्टन वर भिडणार, आपण मात्र ‘या’ ठिकाणी सामना पाहणार!