बर्मिंघममध्ये २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताचा हॉकी संघही विजयाचा प्रबळ दावेदार असेल. महिला आणि पुरुषांच्या हॉकी संघाने गेल्या १-दीड वर्षात आपल्या प्रदर्शनात भरपूर सुधारणा केली आहे. याचा नमुना मागील टोकियो ऑलिंपिकमध्ये पाहायला मिळाला होता, ज्यात पुरुषांच्या हॉकी संघाने ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले होते. या विजयी कामगिरीनंतर भारताच्या हॉकी संघावरील अपेक्षांचे ओझे वाढले आहे.
यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) भारतीय संघापुढे ६ वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा दबादबा संपुष्टात आणण्याचे आव्हान असेल. भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) याने अपेक्षा व्यक्त केली आहे की, भारताचा संघ यंदा ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यशस्वी राहिल.
हरमनप्रीत सिंगची कॉमनवेल्थ गेम्सबद्दल प्रतिक्रिया
बर्मिंघम गेम्सबद्दल बोलताना स्टार डिफेंडर हरमनप्रीतने विश्वास व्यक्त केला की, “भारतीय संघ यावेळी सामन्यांचा निकाल पालटण्यात यशस्वी राहिल. हरमनप्रीत म्हणाला की, संघ सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. आम्ही एफआयएच हॉकी प्रो लीगमध्येही चांगला खेळ केला होता. याचमुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्हाला सतत सामने जिंकत राहायचे आहे. आम्ही निश्चितपणे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी आमचे सर्वश्रेष्ठ प्रयत्न करू.”
“कॉमनवेल्थ गेम्ससाठी आमची तयारीही खूप चांगली सुरू आहे. आम्ही सराव सत्रादरम्यान आमच्या खेळातील काही विशेष पैलूंवर काम करत आहोत. आमचे लक्ष्य एफआयएच हॉकी प्रो लीगमधील चुका सुधारण्यावर आहे,” असेही त्याने पुढे म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंजोबा, आजोबा, वडील सर्वच क्रिकेटपटू होते, पण एका चुकीने संपलय ‘त्याचं’ करिअर
अरर ! लईच वाईट अवस्था, सराव करायचाय पण श्रीलंकन खेळाडूंकडे नाहीये ‘ही’ गोष्ट
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल