यावर्षी पहिल्यांचा कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेट खेळवले जात आहे. भारतीय महिला संघ कॉनवेल्थ गेम्समध्ये चांगले प्रदर्शन करत आहे आणि पदक पटकावण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. उपांत्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने सामने आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना खेळवला जाईल. हे दोन्ही सामने ७ ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत. या सामन्यात भारतीय संघातील ५ खेळाडूंवर सर्वांचेच लक्ष्य असेल. या खेळाडू चांगले प्रदर्शन करू शकल्या, तर संघाचा विजय सोपा होईल.
१. स्म्रीती मंधान –
भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana ) हिचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. कॉमवेल्थ गेम्समध्ये भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले आणि स्म्रीतीने यादरम्यान ९२ धावांचे योगदान दिले. यामध्ये तिच्या एका अर्धशतकाचाही सामावेश आहे. या धावा तिने १३९ स्ट्राईक रेटने केल्या आहेत. तिने सलामीवीराच्या रूपात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशात उपांत्य सामन्यात स्म्रीतीचा अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो.
२. शेफाली वर्मा –
युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा (Shefali Verma) हिची भूमिकाही इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महत्वाची ठरणार आहे. तिने आतापर्यंत संघासाठी चांगले प्रदर्शन केले आणि संघसाठी सर्वाधिक १०७ धावांचे योगदान दिले आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट १५७ चा होता. अशात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही ती असेच प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. तित्या टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर ३५ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या मदतीने ८६० धावा केल्या आहेत.
३. हरमनप्रीत कौर –
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्यावर या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल. तिने कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या सामन्यात ५२ धावांची खेळी केली होती. परंतु बारबाडोसविरुद्धच्या सामन्यात तिला स्वतःचे खातेही खोलता आले नाही. गेम्समधील पहिल्या तीन सामन्यांमध्ये हरनप्रीतने एक विकेटही घेतली आहे. तिच्या एकंदरीत टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर तिने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
४. रेणुका सिंग –
वेगवान गोलंदाज रेणुका सिंग (Renuka Singh) हिने कॉमनवेल्थमध्ये अतापर्यंत जबरदस्त प्रदर्शन केले आहे. तिने स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये प्रत्येकी चार-चार विकेट्स पटकावल्या. ऑस्ट्रेलिया आणि बारबाडोसविरुद्धच्या सामन्यात त्याने हे प्रदर्शन केले आहे. १० धावा खर्च करून ४ विकेट्स हे तिचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. तिने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या आहेत. उपांत्य सामन्यातही तिच्याकडून अशाच उत्कृष्ट गोलंदाजीची अपेक्षा असेल.
५. दीप्ती शर्मा –
भारतीय महिला संघाची अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) नवीन चेंडसह कमाल प्रदर्शन करू शकते. तसेच फलंदाजीतही मोठी खेळी करू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने ५ च्या इकॉनॉमी रेटने महत्वाच्या २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच बारबाडोसविरुद्धच्या सामन्यात ३५ धावांची नाबाद खेळी करून संघाची धावसंख्या १६२ पर्यंत पोहोचवली.
या पाच खेळाडूंव्यतिरिक्त भारतीय महिला संघासाठी अष्टपैलू पूजा वस्त्रकार आणि जेमिमा रॉड्रिग्ज या खेळाडूही चांगली खेळी करू शकतात. इंग्लंड महिला संघाची टी-२० क्रिकेटमधील आकडेवारी भारताच्या तुलनेत चांगली आहे. भारताने इंग्लंडकून एकूण १७ टी-२० सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे, तर ५ सामन्यात इंग्लंड संघ पराभूत झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कसलं भारी ना! दिनेश कार्तिकच्या पत्नीशी कांस्य पदक विजेत्या सौरव घोषालचे आहे जवळचे नाते
मोहम्मद शमीच्या टी२० कारकिर्दीवर नेहमीसाठी ब्रेक? निवडकर्त्यांनी कारण सांगून बसवलंय बाहेर
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद